मान्यवर यांच्या उपक्रम विषयी प्रतिक्रिया
विविध मान्यवर यांच्या उपक्रम विषयी प्रतिक्रिया महादेव आबा माळी , राज्य अध्यक्ष , निदेशक संघटना चौथ्या आठवडयातील सहभागी सर्व स्पर्धकांचे तसेच विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व सर्वांनाच पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ... निदेशक संघटनेच्या आपणा सर्व शिलेदारांनी या चळवळीच्या माध्यमातून सिद्ध केले आहे की आम्ही संघटनात्मक व तांत्रिक कौशल्याबरोबरच सांस्कृतिक कौशल्यामध्येही कुठे कमी नाही. स्पर्धेसाठी योग्य ती सर्व प्रक्रिया पार पाडून मोलाचे योगदान देणाऱ्या, आयोजक, सहाय्यक, परीक्षक, मार्गदर्शक तसेच टेक्निकल टीमचेही मनापासून खूप खूप अभिनंदन निश्चितच आपणा सर्वांच्या माध्यमातून निदेशक संघटनेची अशीही एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि याचा संघटनेस सार्थ अभिमान आहे. पुनःश्च सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे मार्गदर्शक आणि निदेशक संघटनेचे पितामह माननीय भ...