निदेशक सांस्कृतिक चळवळ ची सेमी फायनल कडे वाटचाल
संपूर्ण रसिक वर्ग यांना आनंदाची बातमी , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त , कोरोनाच्या या पार्श्वभूमी मध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रशिक्षण work from home राबवत असतानाच समाजातील व कुटंबातील नैराश्य या भावनेवर मात करण्यासाठी गेला दोन वर्षा पासून कार्यरत निदेशक सांस्कृतिक चळवळ व्हाट्सअँप ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION चे आयोजण संपूर्ण डिजिटल व्यासपीठ चा वापर करून , दिनांक 02 जून 2020 पासून करण्यात आले होते , स्पर्धा पाच आठवड्याची नुसार दर आठवडा सुरवातीपासून , सोमवार पासून ते शनिवार पर्यंत स्पर्धा खुली होती , संपूर्ण महाराष्टातून निदेशकांनी भरीव प्रतिसाद देत प्रत्येक आठवड्याला गाणे रेकॉर्डिंग करून youtube स्वरूपाचे निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप वर अपलोड केले व नोंदणी करीता असलेला google form भरून , ६० ते ६५ गायक निदेशक गायक कलाकारांनी online नोंदणी करून सहभाग घेतला दर रविवारी निकाल जाहीर करण्यात आले असून , दर आठवड्याला स्पर्धेतून तीन निदेशक कलाकारा...