Posts

Showing posts from June 26, 2021

अकोल्यातील सात वर्षाच्या चिमुकलीचा मंत्रमुग्ध स्वराविष्कार

Image
                        अकोला जिल्ह्यामधील माउंट कॉर्मेल या शाळेत शिकणाऱ्या व मूळच्या विदर्भ कन्या असलेल्या कु. श्रुती रविप्रकाश भांडे या चिमुकलीने  'सा रे ग म पा- लिटिल चॅम्प्स' या झी टीव्ही वरील गायन स्पर्धेमध्ये वयाच्या ७ व्या वर्षी  इतिहास घडवून संपूर्ण महाराष्ट्र व परीक्षक यांना मंत्रमुग्ध केले.     गायनाच्या स्पर्धेत, अतिशय प्रतिष्ठेचे व पारदर्शक व्यासपीठ असलेल्या 'सा रे ग म पा - लिटिल चॅम्प्स' या झी टीव्हीच्या  या संगीत मंचावरील गायन स्पर्धेमध्ये मूळच्या विदर्भ कन्या असलेल्या कु. श्रुती रविप्रकाश भांडे या चिमुकलीने अतिशय भावनिक गायन करून संपूर्ण गायन क्षेत्रातील मंडळींना अचंबित केले आहे. प्रतिक्रिया देतांना 'फक्त निःशद्ब' असाच उच्चार प्रत्येक रसिक मनातून बाहेर पडला.    कु. श्रुतीचे वडील श्री. रविप्रकाश भांडे यांचे वडिलोपार्जित गाव म्हातोडी हे आहे. ते नोकरीनिमित्त अकोला येथील विद्या मंदिर हायस्कूल मध्ये शिक्षक आहेत. श्रुतीचे आजोबा श्री. भगवान भांडे हे सुद्धा सेवानिवृत्त हायस्कूल शि...