महाराष्ट्र राज्य आय. टी. आय निदेशक संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र राज्य निदेशक सांस्कृतिक चळवळीचा 3 रा वर्धापन दिन.. आभासी सभा घेऊन , आनंददायी उत्साही वातावरणात संपन्न

 महाराष्ट्र राज्य आय. टी. आय निदेशक संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र राज्य निदेशक सांस्कृतिक चळवळीचा 3 रा वर्धापन दिन.. आभासी सभा घेऊन ,  आनंददायी उत्साही वातावरणात संपन्न

नेटक्या आणि अप्रतिम नियोजनात संपन्न झालेल्या या समारंभाला जीवंत स्वरूप प्राप्त झाले ते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे,संपूर्ण राज्यकार्यकारिणी पदाधिकारी, सर्व विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे, तसेच या ऑनलाईन सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या निदेशक सभासदांमुळे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भारावून गेलेल्या मनांमुळे खरे सांगायचे म्हणले तर सुरवातीपासून शेवटपर्यंत समारंभ ऑनलाईन वाटलाच नाही.. अगदी सर्वकाही समोरच चालू असल्याचा भास सर्वांनाच झाला..... संघटनेचे पितामह श्री भोजराजजी काळे आणि राज्याध्यक्ष श्री महादेवजी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेन भांडे आणि त्यांच्या टीम ने अतिशय कष्टाने केलेले समारंभाचे नियोजन नजर लागण्यासारखे होते 

यानिमित्ताने संघटनेचा पोवाडा आणि संघटनेचे शीर्षक गीत असावे हे पितामह भोजराजजी काळे यांचे असणारे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेले 

निदेशक सांस्कृतिक चळवळीचे सदाबहार कलाकार श्री सिद्धार्थजी मेहेरे सर यांनी संघटनेचा इतिहास, संघटनेचे कार्य, संघटनेच्या शिलेदारांची जिद्द,चिकाटी यावर अप्रतिम पोवाडा रचला आणि त्याला चाल देण्याचे आणि सादर करण्याचे खडतर कार्य पूर्ण केले ते गुरुवर्य श्री लक्ष्मणरावजी जाधव सर यांनी पोवाड्याला लागणारी चाल त्यासाठी लागणारा भारदस्त आवाज,त्याकरिता करावे लागणारे संगीत नियोजन या पोवाड्याश्या निगडित असणाऱ्या आव्हानात्मक बाबींचे नियोजन श्री जाधव सर यांनी अतिशय कष्टाने करून अप्रतिमरित्या हा पोवाडा सादर केला 

निदेशक सांस्कृतिक चळवळीचे अष्टपैलु गायक कलाकार श्री आशिषजी खरात यांनी त्यांच्या धारधार लेखणीमधून संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करणारे शीर्षकगीत तयार केले आणि त्यास चाल देण्याचे आणि संगीताच्या तालात, अप्रतिम सुरात सादर करण्याचे आव्हानात्मक कार्य पेलले ते संगीतनिष्णात गायिका सौ भावनाजी मानकर यांनी आणि त्यास सार्थ साथ दिली श्री मधुजी उघडे  सर , सौ मोरे मॅडम, श्री दिलीपजी शिरभाते सर,श्री सुरेनजी भांडे सर या संघटनेच्या शिलेदारांनी आणि चळवळीच्या कलाकारांनी त्यानंतर निदेशक संघटनेचे शिलेदार आतिषजी सुरवसे सर यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या संघटनेच्या खास ध्वजाचे देखील अनावरण झाले.

माननीय आमदार विक्रमजी काळे, माननीय आमदार बाळारामजी पाटील, माननीय आमदार जयंत आसगावकर यांनी त्यांच्या मनोगतांमधून संघटनेच्या कार्याचा गौरव केला आणि संघटनेविषयी असणारी आस्था प्रकट केली. संघटनेमध्ये असणाऱ्या एकजुटीची त्यांनी खुप प्रशंसा केली.यानिमित्ताने संघटनेचे पितामह भोजराजजी काळे, राज्याध्यक्ष महादेवजी माळी,राज्य सरचिटणीस विनोदजी दुर्गपुरोहित यांनी संघटनेच्या मावळ्यांना केलेले उत्तम मार्गदर्शन कायम स्मरणात राहील काही ज्येष्ठ निदेशकांनी देखील संघटनेचा इतिहास, संघटनेचा लढा, संघटनेची आंदोलने, त्यामध्ये निदेशकांचा असणारा सहभाग.. काही निदेशकांनी दिलेले बलिदान या बाबींचा अंतर्भाव असणारी मनोगते व्यक्त केलीत 

निदेशक संघटनेचे राज्य सदस्य आणि निदेशक सांस्कृतिक चळवळीचे ज्येष्ठ गायक श्री मंगेशजी पुंडकर सर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानन्याचे कार्य पूर्ण केले

असा हा चिरकाल स्मरणात राहील असा दैदीप्यमान सोहळा 

निदेशक संघटनेचा विजय असो

निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो


























Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे