निदेशकांना आनंदाची बातमी , संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त , निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना वर आधारित ONLINE KARAOKE COMPETITION मध्ये भाग सहभागी होण्याची सुवर्ण संधी

आनंदाची बातमी , सर्व सभासदांना नमस्कार , 

महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,  कोरोनाच्या या पार्श्वभूमी मध्ये नैराश्य या भावनेवर मात करण्यासाठी निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION  चे  आयोजण दिनांक 02 जून 2020 पासून करण्यात आले आहे  ,  स्पर्धा दर आठवडा सुरवातीपासून , सोमवार पासून ते शनिवार पर्यंत स्पर्धा खुली राहील , दर रविवारी निकाल जाहीर होणार , संपूर्ण स्पर्धेतून 3 गाणे निवड होईल , स्पर्धेच्या   परिक्षणाचे काम श्री भोजराज काळे सर व सौ भावना मॅडम पाहतील , गाणे रेकॉर्डिंग फक्त विडिओ youtube स्वरूपाचे ग्रुप वर अपलोड करावे व सोबत दिलेला google form भरणे गरजेचे आहे  , कृपया , आपल्या सर्वांच्या सूचना व मत  अपेक्षित , उद्देश आपल्या निदेशक परिवार मध्ये संगीत या क्षेत्रात गायन मध्ये सुधारणा करणे व  विजयी व सहभागी कलाकारांना ग्रुप तर्फे आकर्षक प्रमाणपत्र , निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप मध्ये सहभागी होणे करिता लिंक --    
https://chat.whatsapp.com/LY1fUEgJFMl56Y2DwrRKuf ,  स्पर्धेचे सर्वाधिकार आयोजक यांचे कडे सुरक्षित राहतील

Comments


  1. 🙏🏻 निदेशक संघटनेचा विजय असो🙏🏻
    कारण तुमचं आणि माझं अस्तित्व हे फक्त आणि फक्त संघटनेच्या व्याप्ती वरती आणि संघटनेच्या एकीवर अवलंबून आहे.हे प्रत्येक निदेशक हा मनापासून जाणून आहे.याची कल्पना मला आहे.आणि आपणा सर्वांनाही आहे.आज हे व्यासपीठ संघटनेनं उभं केलं कुणाला माहीत होतं की आपल्या अंतरालातील गुण कौशल्य आपण या व्यासपीठावर सादर करू... शकू.पण हे सर्व श्रेय संघटनेच्या सर्व तुमच्या-माझ्या शिलेदारांचं आहे पुन्हा एकदा निदेशक संघटनेला प्रणाम......🙏🏻२८/६/२०२०

    ReplyDelete
  2. 🙏🏻 *प्रथमता निदेशक संघटनेचा विजय असो🙏🏻*
    आयुष्याच्या अस्ताकडे झुकलेल्या मनाला,पुन्हा सळसळ करत उगमापर्यंत घेऊन,तारुण्यामध्ये उभे करणाऱ्या निदेशक सांस्कृतिक चळवळीचा रास्त अभिमान आहे,.कोणाला माहित होतं की,प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो.आणि त्याला व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम हे फक्त आणि फक्त निदेशक संघटनेने केलं आहे. आपल्याचं माणसांमध्ये जिंकणं किंवा हरणं हे गौण आहे. हार जित तो बहादुरी किस्मत के दो सितारे होते है. आयुष्याच्या या वळणावर अस्ताकडे चाललेल्या, वठलेल्या वृक्षाला आधाराची संजीवनी या निदेशक सांस्कृतिक चळवळीने दिली आहे. आता सुंदर पालवी फुटलेली आहे,मोगरा फुलला,चाफा बहरला,केवड्याचा सुगंध आसमंतात दरवळून उरला. ही स्वरगंगा अशीच अखंड तेवत राहो हीच या क्षणी प्रार्थना. असेच आम्हां सर्व सहकार्यावरती प्रेम करत राहा. जाता जाता सुरेश भटांच्या एका कवितेतील ओळी खूप सांगून जातात. *प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधे रुजून सुद्धा,नभापर्यंत पोहोचलेलं* . पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद *जय निदेशक संघटना* 🙏🏻५/७/२०२०

    ReplyDelete
  3. 🙏🏻 सुरेंनजी भांडे सरजी,आपण निस्वार्थीपणे व स्व:कुटुंबाचाही कदाचित विचार न करता सुद्धा,खूप खूप या अनमोल व अकल्पित कार्याला वेळ दिला. व तमाम महाराष्ट्रातील सर्व निदेशक सहकारी यांनी आपल्या अंतर्मनात दडलेली कला सादर करण्याचं एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. माझ्या मते ज्याची उंची माझ्या नजरेतून हिमालयापेक्षाही मोठी आहे. कारण चारचौघात बसून गाणं आणि प्रत्यक्ष वेगवेगळी उपकरणे वापरून,वेगवेगळ्या ॲपचा वापर करून गाणं.... इतरांच्या कलागुणांचे कौतुक करणं.... हे केवळ आणि केवळ निदेशक सांस्कृतिक चळवळीमुळे झालेला आहे. व त्यासाठी आपण अपार परिश्रम घेतलेले आहेत. मी तमाम निदेशक बंधू भगिनींच्यावतीने आपणास खूप खूप धन्यवाद देतो.💐💐💐

    ReplyDelete
  4. 🌹*NSCग्रुप*🌹

    *जपायचंय आपल्या हृदयातील गीताचं हृदयस्पर्शी संगीताचं नातं म्हणून महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेने केला ग्रुप*
    *सगळेच आपले म्हणून, भावना जपा खूप*

    *कोणी दिला reply म्हणून आनंदून जायचं नाही*
    *आणि नाही दिला reply म्हणून खंत मानायची नाही*

    *सर्वांची मत कायम,एकसारखी असतील कशी*
    *नकारार्थी,सकारार्थी, प्रत्येकाची वेगळी राशी*

    *राखायची असेल अबाधित,एकमेकांची साथ*
    *तर दयावाच लागतो सर्वांना,प्रेमाचा हात*
    * *म्हणून विनंती आहे सर्वांना, देऊया चांगला प्रतिसाद सर्वांच्या गाण्यांना.
    🙏🏻धन्यवाद सर्वांना🙏🏻**

    ReplyDelete
  5. 🌹प्रथमता सेमीफायनल-२मध्ये सहभागी सर्व माझ्या गायक सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. यासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली होती व आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करण्याचा प्रयत्न केला होता जिंकणं किंवा हरणं हा दुय्यम भाग आहे. मंजिल मिले ना मिले !
    ये तो मुकदर की बात है!
    हम कोशिश भी ना करे
    ये तो गलत बात है.....
    उनिवा सर्वांच्या मध्ये आहेतच. परीक्षकांचा निकाल हा खूप अंतिम विचार करून अथक परिश्रमाने जाहीर झालेला आहे. तो आपणा सर्वांना शिरसावंद जे विनर म्हणून अंतिम फेरीसाठी पात्र आहेत त्यांचेही खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
    त्याच प्रमाणे आदरणीय भोजराजजी काळेसर,
    सौ भावना मॅडम., श्रीयुत माळीसर अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य निदेशक संघटना व आपणा सर्वांचे लाडके श्रीयुत सुरेनजी भांडेसर आपण सर्वांनी हा कल्पकतेतून संगीतरुपी मंच उभा केला व आम्हा सर्वांना आमच्या अंगी लपलेली गायन कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन व संधी दिली.आपले खूप खूप आभार
    आपला सहकारी: एल.एम.जाधव.🙏🏻

    ReplyDelete
  6. *वेध.....पर्व -२चे.*
    महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेने,यंत्राच्या गर्तेत हरवलेल्या सहकाऱ्यांच्या मनाचा नेमका ठाव घेऊन निदेशक सांस्कृतीक चळवळ हे व्यासपीठ दिमाखात उभं केलं. देशासाठी कारागिराच्या रुपात कुशल, सुसंस्कारित, व खणखणीत नाणे बनवणाऱ्या व त्यांच्या जीवनाचा भक्कम पाया उभा करणारा शिल्पकार,ऋषितुल्य निदेशक बांधवांना सध्याच्या जागतिक नैराश्याच्या गर्तेतून मुक्त करूनअंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला.प्रथमता सर्व पदाधिकाऱ्यांना दंडवत....पर्व-१च्या रुपात लावलेल्या संगीतमय रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. आयोजकांना या माध्यमातून सहृदय विनंती की, पर्व-2 लवकरात लवकर सुरू करून(कारण पंधरा तारखेपर्यंत पर्व-दोनचे दोन राऊंड होतील असे वाटते. ह्यासाठी कामाचा थोडासा ताण वाढेल याची जाणीव आहे) यापूर्वी स्पर्धेत सहभागी न झालेल्या सहकाऱ्यांना व पर्व एक मधील अंतिम फेरीत सहभागी न झालेल्या इतर सर्व सहकाऱ्यांना अमूल्य अशी संधी द्यावी.(अंतिम फेरीतील सहकाऱ्यांना पर्व दोनच्या स्पर्धेच्या फेरीसाठी वगळून मात्र त्यांना त्यांची गायकी जोपासण्यासाठी या ग्रुप वर गाणी पोस्ट करण्याचे हक्क अबाधित ठेवून not for competition या शीर्षकाखाली त्यांनी गायलेली गाणी अपलोड करू शकतात) अर्थात... सर्व हक्क अधिकार हे आयोजन समितीचे आहेत. ही स्वरगंगा अशीच खळखळून वाहत अमृततुल्य संगीतमय जलपान सर्व सहकाऱ्यांना अखंडित करील. तसेच पर्व-एक मधील अंतिम फेरीच्या सहकाऱ्यांना एखादी वेगळी जबाबदारी देता येईल का? याचाही विचार व्हावा. सर्वांना विनम्रपूर्वक विनंती की, कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मी माझे स्व:मत या ठिकाणी व्यक्त केले आहे. आपले मार्गदर्शक आदरणीय भोजराजजी काळेसर, परीक्षक सौभाग्यवती भावनाताई,श्रीयुत महादेवजी माळी सर. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य निदेशक संघटना व राज्य कार्यकारिणी, तसेच सर्व तांत्रिक बाबी सांभाळणारे श्री.सूरेनजी भांडेसर व त्यांचे सहकारी आपणा सर्वांच्या विचारार्थ... 🙏🏻धन्यवाद.
    आपलासहकारी:-LM.जाधव आयटीआय औंध पुणे

    ReplyDelete
  7. *🌹स्वागतम पर्व-2.🌹*
    मित्रहो...खरोखरचं निदेशक म्हणून,आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग वा पूर्वाश्रमीचं पुण्य. आणि भविष्यातही असंख्य लोकांच्या मनामनात स्व:गीतांच्या माध्यमातून अखंड जिवंत राहू हे आपले भाग्य म्हणावे लागेल, हे साध्य झाले... केवळ निदेशक सांस्कृतीक चळवळीच्या माध्यमातून, हा अमूल्य स्वर्णिम ठेवा जतन करूया....संघटनेच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु केलेल्या,पर्व-एकच्या यशस्वी आयोजनानंतर, आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव... पर्व-दोनच्या रूपाने हा संगीत वारसा अधिक जोमाने पुढे चालवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. NSC आयोजन समिती, संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद, मान्यवर परीक्षक व श्री सूरेनभांडे सर आपले खूप खूप आभार व धन्यवाद...🙏🏻

    ReplyDelete
  8. *आरंभ प्रारंभ प्रत्यारंभ.*
    🤝🏻संघटनेच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु केलेल्या, NSC पर्व-एक मधील अंतिम फेरीमध्ये सहभागी सर्व कलाकारांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केलेले आहेत.खरंच कौतुक करावे तेवढे थोडे....
    माझ्यासारखा कधीतरी गुणगुणनारा आज अनेक बारकाव्यांचे आकलन करू लागला.....
    मेरी जिंदगी सवारी,मुझको गले लगाके l
    बैठा दिया फलकपे,मुझे खाक से उठाके l
    संघटनेचे भिष्माचार्य श्रीयुत भोजराजजी काळेसर, परीक्षक सौ.भावनाताई, राज्याध्यक्ष महादेवजी माळीसर,राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सर्वांचे प्रिय,श्रीयुत सूरेनजी भांडेसर. त्याच बरोबर श्रोतेवर्ग म्हणून तमाम महाराष्ट्रातील संघटनेच्या आजी-माजी शिलेदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.आपल्या सर्वांच्या दूरदृष्टीची ही फलश्रुती आहे.
    NSC पर्व-दोनचा सुद्धा धूमधडाक्यात शुभारंभ झालेला आहे.जुन्या बरोबरच अनेक नवीन सहकारी जोमाने तयारी करत आहेत.त्यांना सह्रदय शुभेच्छा.काळेसरांच्या भाषेत सांगायचं झालं तर, "आता थांबायचं नाही"स्पर्धेमध्ये सहभागी सर्वजण विजेतेच आहेत.
    छूंजाऊ या छूंनासकूं मैं आसमांको,
    तो कोई ग़म नहीं,
    बस छूजाऊँ दोस्तोंके दिलोंको ,
    येभी तो आसमांसे कम नही......!!
    पर्व-एक व पर्व-दोन सहभागी सर्व सहकारी गायक कलाकारांना खूप खूप शुभेच्छा.
    🙏🏻धन्यवाद
    आपला सहकारी,
    लक्ष्मण जाधव.आयटीआय औंध पुणे.

    ReplyDelete
  9. 🌹 हे सर्व श्रेय दूरदृष्टी असणारे श्रीयुत भोजराजजी काळेसर आपले लाडके अध्यक्ष श्रीयुत माळीसर,निदेशक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यां बरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मनापासून सहकार्य करणारे सर्व निदेशक बंधू-भगिनी आणि भांडे सरजी,आपल्या मेहनतीचा परिणाम आहे की, आम्हा सर्वांना या व्यासपीठावर संधी देऊन आपल्याच संघटनेच्या सहकाऱ्यांच्या मध्ये गायनाचे लपलेले सुप्त गुण सादर करता आले. हे आम्हा सर्वांचे परमभाग्य आहे की, यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकांच्या ओळखी बरोबरच जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या या कार्याला सहृदय सलाम🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे