प्रतिक्रिया मान्यवरांच्या - थोडेसे निदेशक सांस्कृतिक चळवळ विषयी

स्पर्धा करण्यापेक्षा संगीताचा निखळ आनंद घेता आला पाहिजे ,    विनोद दुर्गपुरोहित ,  चंद्रपूर 

       भारतीय संस्कृतीत संगीताला पंचम वेद म्हणतात.संगीत हा भारतीयांचा आत्मा आहे.नागरपासुन तर आदीवासी संस्कृतीपर्यत जन्मापासुन ते मृत्युपर्यत आपल्या प्रत्येक क्षणात संगीत आहे.म्हणुन आपल जगणच संगीत आहे.म्हणुनच आपल्या नाट्यशास्रामधे संगीत आहे नाट्यसंगीत हा मराठी माणसाचा चिरस्मरणिय ठेवा आहे.आपला कुठलाही चित्रपट एक वेळेस कथा नसली तरी चालेल पण संगीत असल्याशिवाय तो पुर्णच होत नाही.गेल्या पाच हजार वर्षात अनेक थोर गायक वादक या भरतभुमीत होउन गेले.आजही त्याची वाणवा नाही.त्यामुळे प्रथम ध्वनी आला मग शब्द आले हा भाषेचा इतिहास आहे.निसर्गाची पशुपक्षांची भाषा ही संगीतमयच असते.समुद्राची गाज असो नदीचा खळखळाट असो,की पक्षांचे कुजन असो हे निसर्ग संगीत आपल जीवन आनंदी करत असत.आपणही त्या निसर्गाचीच लेकर असल्यामुळे आपलही संगीत त्या निसर्गाचीच देण आहे.त्यामुळे निसर्ग आणि संगीत हे अव्दैत आहे.तोच निसर्ग माणसावर कशी वेळ आणेल सांगता येत नाही.आज जी वेळ आपल्यावर आली आहे ती अशीच अनपेक्षित आहे.पण प्रत्येक परीस्थितीवर मात करण्याची विजीगिषु वृत्ती या मानवी समुहाकडे असल्यामुळे हजारो वर्षांपासुन हा मानवी समुह टिकुन आहे.जगात अंतिम काहीच नसत हे त्याला माहिती आहे म्हणुन तो कोणत्याही संघर्षास तत्पर असतो.अशा भिषण परीस्थितीत आनंदी व सकारात्मक राहायचे असेल तर संगीता शिवाय पर्याय नाही.म्हणुनच आपण या संगीत स्पर्धेचा घाट घातला व त्याला उत्तम प्रतिसाद लाभला सुरेनने ही कल्पना मांडली व काळे सर व संघटनेने ती उचलुन धरली.त्याचच फलित हे आहे की गेला महिना दिड महिना कसा गेला कळलच नाही नाही तर वेळ जाता जात नव्हता हा सार्वत्रिक अनुभव आहे.या स्पर्धेच्या आता अंतिम टप्प्यावर आलेलो आहे.आता हे सगळ संपेल अशी एक हुरहुर मनात दाटलेली आहे.पण कोणताही उपक्रम असो तो सगळ्यांच्या मनात एक अनामिक हुरहुर सोडुन जातो तो उपक्रम यशस्वी झाला अस निखालस समजावे त्यादृष्टीने हा संगीतमय उपक्रम यशस्वी झाला असे समजावयास हरकत नाही.आता राहाता राहिला प्रश्न यशापयशाचा तर स्पर्धा म्हटली की कोणीतरी विजयी होणार तर कोणीतरी अपयशी होणार हा सृष्टीचा नियम आहे.पण म्हणुन कोणी जगायच थांबत नाही.घडणाऱ्या प्रत्येक घटणेतुन सकारात्मक संदेश असतो अपयश ही पुढील यशाची पायरी असते.दशांशाने मेरीट लिस्टचे क्रमांक मागेपुढे होत असतात म्हणजे मागे जाणारा हुशार नसतो अस होत नाही त्यामुळे स्पर्धा करण्यापेक्षा संगीताचा निखळ आनंद घेता आला पाहिजे.तो घेता आला की जगण्याचाही अर्थ आपल्याला आपोआप कळतो.व जगणे अधिक सुंदर करतो.सगळ्या सहभागी कलावंतांचे अभिनंदन तसेच अंतिम फेरीसाठी शुभेच्छा.तसेच सगळ्या रसिकांचे सुध्दा आभार त्यांच्यामुळेच स्पर्धेला मजा आली.सरते शेवटी अत्यंत जिकरीचे असणारे परीक्षणाचे काम अतिशय संयमाने करणाऱ्या श्री काळेसर व सौ.मानकर मॅडम यांचे सुध्दा अभिनंदन करतो व आभार मानतो. 
                 विनोद दुर्गपुरोहित
                    सरचिटणिस
                निदेशक संघटना

सभासदांमधील कलागुणांना वाव देणे या शुद्ध हेतूनेच निदेशक संघटनेच्या सांस्कृतिक चळवळ या ग्रुपची  स्थापना करण्यात आली आहे  ,    महादेव माळी , पुणे  

     आदरणीय काळे सर आपण खूप सुंदर विश्लेषण केले आहे. मुळातच नैराश्यातून  बाहेर येणे,आनंदी राहणे , दुसऱ्याला आनंद देणे  व सभासदांमधील कलागुणांना वाव देणे या शुद्ध हेतूनेच निदेशक संघटनेच्या सांस्कृतिक चळवळ या ग्रुपची  स्थापना करण्यात आली आहे. ही तर  सुरुवात आहे. संघटनेमध्ये महाराष्ट्रात अजून भरपूर स्पर्धक बाहेर आहेत . पुढील काळात त्यांचाही सहभाग राहील .ही प्रक्रिया सतत चालू राहणार आहे. पुढील काळात अंतिम विजयी स्पर्धकांना वेगळी जबाबदारी देण्यात येईल  व उर्वरित स्पर्धकांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येतील. आपल्याला एवढ्यावरच थांबायचे नाही तर ही चळवळ  पुढे चालू ठेवून
एका वेगळ्या उंचीवर पोचलेली पाहायची आहे. आज पर्यंत सर्वांनी मनापासून आनंद घेतला. 
        आदरणीय  भोजराजजी काळे सरांनी वरील प्रमाणे केलेल्या आवाहनास अनुसरून आपण सर्वजण यापुढेही आनंद घ्याल , आनंद द्याल  व अंतिम फेरी मधील  सहभागी  स्पर्धकांना मनापासून प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा .
               धन्यवाद . 
           महादेव माळी 
            राज्य अध्यक्ष 
           निदेशक संघटना


साधनेचा व कलेचा सन्मान वाढविणे हे आपले प्रथम कर्तव्य ठरते .... भोजराज वा काळे , अमरावती 

      सर्व स्पर्धकांना व ग्रुप मधील सर्वांना नमस्कार.मित्रांनो , मला एक जाणवलं की रिझल्ट नंतर काही नाराज आहेत. नेमकं असं होऊ नये ही विनंती.स्पर्धा म्हटल की रिझल्ट आलाच.प्रत्येकाला विजयी व्हावं हा मानवी स्वभाव.तसच असावही.पण संगीत व क्रीडा ही अशी साधना आहे की यात बरेच परिश्रम असतात ,याची जाणीव प्रत्येकाला असते म्हणून प्रत्येक आपला performance best असावा असाच प्रयत्न असतो म्हणूनच त्याला प्रयत्नाची किंमत माहीत असते म्हणूनच तो दुसऱ्याच्या यशाचं कौतुक करतो.आपल्या संगीत क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढती आहे.तेव्हा या साधनेचा व कलेचा सन्मान वाढविणे हे आपले प्रथम कर्तव्य ठरते . हेच आपले मिशन असावं.म्हणूनच स्पर्धक व विजेता याचं नात घट्ट करून असाच सकारात्मक विचार दृढ करू या.सर्व स्पर्धक अजेय आहेत.औपचारिक विजेते पद आपल्या पाठीशी असतेच.कधीना कधी ते पुढे येईलच या विचाराने सतत प्रयत्नशील असावं.....

Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे