प्रतिक्रिया मान्यवरांच्या - थोडेसे निदेशक सांस्कृतिक चळवळ विषयी







✒️ प्रिय मित्र संजय कलोसेजी... 🎻
Great versatile singer...
(कालची प्रतिक्रिया ही फक्त जुन्या गाण्यांसाठी होती.तुम्हाला सामावून घेतलं नाही.कृपया नाराज राहू नका.तुमचं वेगळ्या ढंगातील गाणं होतं. आज खास तुमच्यासाठी)
 लाई वि न गई ते...... किती जबरदस्त,सुंदर व परफेक्ट गायन,अहमभाग्य आहे की, निदेशक सांस्कृतिक चळवळीचे असे सुंदर गायक सहकारी आपल्या कोषांमध्ये आहेत...
कहीं मिलेगी जिंदगीमें प्रशंसा तो, कहीं नाराजगियों का बहाव मिलेगा,कहीं मिलेगी सच्चे मन से दुआं,तो कहीं,भावनाओं में दुर्भाव मिलेगा,तू चलाचल राही,अपने कर्मपथ पे,
जैसा तेरा भाव वैसा प्रभाव मिलेगा।
बंधू,असेच मनसोक्त गातं रहा,आनंद घेत रहा,आनंद देत रहा. क्षणभंगुर जीवनामध्ये दुसरं काय? संकुचितवृत्तीच्या लोकांच्या प्रतिक्रिया वरती लक्ष देऊ नका. व अशांची अपेक्षाही करू नका... मानवाचे घमेंड फक्त जिवंत आहे तोपर्यंत...सर्व नश्वर आहे...तुमची गायकी प्रफुल्लित होवो,हि आई अंबाबाई चरणी प्रार्थना.🙏🏻
NSC-41.लक्ष्मण जाधव.
आय.टी.आय.औंध,पुणे🌹


उंच झोका एन एस सी चा निमित्ताने , श्री. एल एम सर , गट निदेशक औंध , पुणे

उंच झोका एन एस सी चा निमित्ताने ........ 

🪂 उंच झोका एनएससीचा... 🎻

लहानपणी आपल्या गावी/वाडीत घरात भलामोठ्ठा लाकडी झोपाळा असायचा,चांगले दणकट शिसवीलाकडाचे, छपराच्या नाहीतर माडीच्या तुळयांना पितळी कड्यांनी अडकवलेले ते झोपाळे ... त्याच्यावर घरातील फाटक्या चीद्यांची बनवलेली उशी टाकून ऐसपैस झोपता पण यायचं. गंमत म्हणजे त्या झोपाळ्याला झोका द्यायला लागायचा नाही , कसं  काय माहीत नाही पण, तो आपला संथ हलत राहायचा. आपसूक तंद्री कधी लागायची हे कळतं नसे. घराच्याबाहेर हिरव्यागच्चं आमराईतील झाडांना पंचमीच्या सणाला उंच जाडजूड फांदीला चांगल्या मजबूत दोरीनं बांधलेले व खाली पाय घट्टपणे ठेवता येईल असा, दोन-अडीच फुटाचा लाकडी तुकडा लावून त्यावर मनसोक्त एकट्याने किंवा दोघांनी समोरासमोर दोरी पकडून झोके घेता येतील,अशी जोडणी असायची.बाजूच्या शेतं-शिवारात वाहणाऱ्या पाटाच्या पाण्याचा झुळझुळ आवाज चिमण्या पाखरांचा किलबिलाट... तद्वतं निसांचच्या हिंदोळ्यावर झुलणारीअर्थपूर्ण जुनी गाणी... हलकेच गत:स्मृतींच्या बालपणातं... शालेय जीवनात...घेऊन जातातं.आठवणीने मोहरलेल्या मनावर दवबिंदुंचा शिडकावा क्रमप्राप्त आहे... निवांतक्षणी सादर गीतांचा आस्वाद घेताना इतिहास अलगत डोळ्यासमोरून तरळून जातो. या सप्ताहात ग्रुपच्या  सहकाऱ्यांनी स्व:रसुमनांची यथेच्छ: उधळण केलेले आहे.... मेंटर श्रीयुत.संजयजी जाधवसर..सांज ढले गगन तले.... श्रीयुत.अशोकजी भिसेसरांचे युगलगीत व डेलीसाॅंग... श्रीयुत सोमजी पिसोळेसरांची... मराठी भावगीते.. गझल... मेंटर श्रीयुत.संजयजी कोळीसरांचे... नजर ना लग जाये... तेरी आँखों के सिवा... श्रीयुत.शशांकजी पाटीलसर उर्फ दादाजी यांचे अप्रतिम गायन..श्रीयुत.नवरखेडे सरांचं...मेरा दिल भी कितना पागल है... श्रीयुत राजेशजी कांबळेसरांचे... पतझड सावन..ये दुनिया ये महफिल.. कुणाच्या खांद्यावर... श्रीयुत. मोगरकरसरांचे...हमे तुमसे प्यार कितना.. आपकी आंखो मे कुछ... .उगले मॅडम व ऊपरे मॅडम यांची खूप छान गायकी... श्रीयुत सोनकांबळेसरांचे..एक प्यार का नगमा है.. घुंगरूकी तरह... श्रीयुत.शिवाजी हांडेसर यांनी त्यांनी नवीन घेतलेल्या साऊंड सिस्टमवर गायलेलं... खोया खोया चांद.. शोधिसी मानवा.. दिल ऐसा किसीने मेरा तोडा... श्रीयुत.विजयजी मानकरसरांचे..भारत हमको जान से प्यारा है...मेंटर अजयजी जाधवसरांचे..कोई जब तुम्हारा हृदय... अनिलजी काळे सरांचे.. खुदाभी आसमासे... श्रीयुत सिद्धार्थजी मेहरसरांचे कुछ ना कहो कुछ भी ना कहो...किती सुंदर छान गीतांचा वर्षाव... त्याचबरोबर इतर सहकाऱ्यांनी पाठवलेल्या टिप्स...एक दिवस जरी श्रीयुत.रंजयजी/निरंजन दळवीसर ग्रुपवर नसतीलं तर, ग्रुप सुना सुना वाटतो. सर्व सहकार्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणादायक,अंत:करणापासूनच्या प्रतिक्रिया.. निसांचला वाहून घेतलेले अविरत कार्य करणारे व सदैव हसतमुख असणारे आपले सहकारी सुरेनजी भांडेसर यांचे मानावे तेवढे आभार...

प्रत्येकाचा गायकीचा झोका वेगळा ... त्याची उंची किती हवी? हा ज्याचा त्याचा प्रश्न...तो दुसऱ्यांनी का ठरवावा...आणि आपणही तो दुसऱ्यांना का ठरवू द्यावा? (सहमती असेल तर हरकत नाही.) आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत हे जरूरी नाही ..संथ हलणाऱ्या झुल्यांनाही त्यांची स्वतःची एक उंची असतेचकी.. ज्याचा त्याचा आपल्या परीने गायनरुपी झुलणारा झोका...

दोस्तो,आप..मै..ऐसे ही सभीके गाने दिलसे सुनते रहीये, प्रतिक्रियां दे और पढंते रहीयेगाजी...अगले हप्ते कुछ अच्छा लिखकर...फिर दूंगा दस्तक...निसांचकी दहलीजपर.. 🙏🏻नमस्कार.

आपला सहकारी,

NSC-41.लक्ष्मण जाधव.

आय.टी.आय.औंध,पुणे🌹 


बन्सीलालजी सोमकांबळे सर  , 

     काय सुंदर लिहीलात सर. वाचून आनंद झाला. खरंय प्रत्येकाच्या गायकीचा झोका, त्याची उंची वेगळी पण या मंचाने प्रत्येकातील लपलेल्या  गायकीच्या सुप्त गुणाला वाट करून दिलं. त्यामुळे सर्वांच्या गाण्याचा मनसोक्त आनंद घेता येत आहे. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा



सुरों का ये कारवां अभी निकल पडा हॆ, अपने अगले मुकाम की ऒर.

निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या  पहिल्या पर्वामधील सर्व विजेत्यांचे निदेशक संघटनेच्या  महाराष्ट्रातील तमाम सभासदांचे वतीने खूप खूप अभिनंदन तसेच आदरणीय भोजराजजी काळे सर व भावनाताई मानकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली व सूरेनजी भांडे सर यांच्या अथक परिश्रमातून सुरू झालेली ही चळवळ पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी  यशस्वीरित्या  पार पाडण्यासाठी आपणास उदंड शुभेच्छा.
       त्याच प्रमाणे अंतिम फेरीमध्ये  सहभागी  उर्वरित  सर्व गायक कलाकारांचेही मनापासून अभिनंदन .त्यांनीही आपली सुंदर गायकी सादर केली . त्या गायकीच्या व  आजपर्यंत घेतलेल्या  मेहनतीच्या जोरावर दुसऱ्या पर्वामध्ये  सहभागी होऊन उत्कृष्ट सादरीकरण  व यशस्वीतेसाठी मनापासून शुभेच्छा. पहिले पर्व यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल परीक्षक व संयोजकांचेही  निदेशक संघटनेच्यावतीने मनापासून धन्यवाद.सर्व विजेत्यांचे निदेशक संघटनेच्या  महाराष्ट्रातील तमाम सभासदांचे वतीने खूप खूप अभिनंदन.तसेच  अंतिम फेरीमध्ये  सहभागी  उर्वरित  सर्व गायक कलाकारांचेही मनापासून अभिनंदन .त्यांनीही आपली सुंदर गायकी सादर केली . त्या गायकीच्या व  आजपर्यंत घेतलेल्या  मेहनतीच्या जोरावर दुसऱ्या पर्वामध्ये  सहभागी होऊन उत्कृष्ट सादरीकरण  व यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा.
           राज्य कार्यकारणी
महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना 


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 म.रा.आय.टी.आय.निदेशक संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिनाचे ऒचित्य साधुन मा.श्री.भोजराजजी काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 🎤 निदेशक सांस्कृतिक चळवळीचे यशस्वी आयोजन करण्याचे शिवधनुष्य श्री सुरेनजी भांडे सर व त्यांच्या टिम ने लीलया पेलले.
त्यांना मोलाचे सहकार्य लाभले त्या सॊ भावनाताई मानकर.
कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो सभासद/सहभागी स्पर्धक. सर्व स्पर्धकांनी खेळिमेळीच्या वातावरणात पहिले पर्व पार पाडले.
पहिल्या पर्वातील सर्व विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन
💐💐💐💐💐

🎤🎤🎤🎤🎤🎤
सुरों का ये कारवां अभी निकल पडा हॆ, अपने अगले मुकाम की ऒर.

🤝🤝🤝🤝🤝🤝

निदेशक चळवळीच्या दुस-या पर्वा करिता आयोजक व स्पर्धक यांना शुभेच्छा

👍👍👍👍👍

   आपलाच
राजेश खडबडे

 

प्रथम मी निदेशक सांस्कृतिक चळवळी च्या पहिल्या पर्वा मधील अंतिम फेरीमधील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो🌹🌹🌹🌹🙏🙏💐💐💐


तसे पाहिले तर अंतिम फेरीमधील सर्वच स्पर्धकांनी आपली कला उत्तम रित्या सादर केली होती,परीक्षकांचा विजेते निवडून काढताना कस लागणार होता हे निश्चितच होते.मॅच मधील सर्वांचीच खेळी चांगली झाली असल्या कारणाने 'Man of the match' अवॉर्ड कोणाला द्यायचे ही परिक्षकांची फार मोठी कसरत होती शेवटी सलग तीन शानदार शतकांची खेळी केल्यामुळे विजेते पदाची माळ श्री संजय आनंदे सर यांच्या गळ्यात पडली,पण अंतिम फेरीमधिल सर्वच जण विजेते आहेत,सर्वच अंतिम फेरी मधील उत्कृष्ट कलावंतांना माझा मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏तसेच श्री भोजराज जी काळे सर,सौ साधना जी मानकर मॅडम ,श्री महादेव जी माळी सर या परीक्षक प्रभुतिंचेआणि या चळवळी करिता अहोरात्र कष्ट घेणारे श्री सुरेन जी भांडे सर यांचे सर्व सभासदांच्या वतीने सादर आभार🙏🙏🙏🙏🙏


श्री संजय आनंदे सर,श्री संजय कोळी सर,श्री किरण वानखेडे सर,श्री संजय जाधव सर ,श्री संजय कलोषे सर,सौ बालपांडे  मॅडम,गुरुवर्य श्री जाधव सर,श्री अजय जाधव सर, श्री अनिल काळे सर, श्री अरुण पाटील सर,श्री मंगेश पुंडकर सर,श्री विवेक देशमुख सर,श्री चंदकांत झापर्डे सर,सौ प्राजक्ता गायकवाड मॅडम,श्री विजयजी मानकर सर,या सर्व कलावंतांचे अभिनंदन🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐🌹🌹🌹
दुसऱ्या पर्वामधिल सर्व कलावंतांना शुभेछ्या👍👍👍
|||निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो|||||

 

 सर्व विजेत्या मझ्या स्पर्धक सहकाऱ्यांचे अंत:करणापासून खूप खूप अभिनंदन अनेकानेक शुभेच्छा. जे या स्पर्धेमध्ये जिंकले नाहीत त्यांनीही असं समजू नये की आम्ही हरलोय सर्वजणचं विजेते आहेत. *थोडाबहुत गांकर बैठै है हम...
हार कर नहीं..!!
सिर्फ आज बाज़ी हाथ से निकली है... ज़िन्दगी नहीं.!!!!**
पुन्हा एकदा सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा
 निदेशक सांस्कृतिक चळवळीचे हे कार्य अहोरात्र चालणार आहे चालत राहणार आहे. आणि याची आपली सर्वांची जबाबदारी आहे आपण निदेशक सहकारी मित्र या नात्याने आपली जबाबदारी अजून वाढणार आहे .जिंकलेले आपलेच सहकारी आहेत हे विसरू नका.ज्या माणसा मध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते ,तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.🙏🏻 जय निदेशक संघटना🙏🏻

 संगीतयात्रेच्या या  पहिल्या पर्वातील सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐🌈, तसेच या पर्वात सहभागी सर्व गायकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन.....ही संगीतयात्रा अशीच अखंडित सुरू राहो आणि निदेशकांच्या एकतेची वीण अजून घट्ट करणारी ठरो याच सदिच्छा , तसेच या करिता मेहनत घेणारे आयोजक आणि सन्माननीय परीक्षक सर्वांचे आभार आणि शुभेच्छा 


 



 

 

 

Comments

  1. संगीत सोहळा
    खुप रंगला सोहळा
    गितांचा..
    पांच आठवड्यांचे
    विजेते गायक..
    पहिल्या पर्वाचे
    बारा गायक..
    होते मैदानात..
    जुळल्या होत्या
    भावना मॅडम..
    काळे सरांनी दिला
    अमुल्य वेळ..
    हिच खरी
    निदेशक सांस्कृतिक
    चळवळ...
    परिक्षकांची
    पण होती कसोटी..
    आयोजकांची
    तारांबळ..
    भुक तहान विसरुनी
    लागली होती हुरहुर...
    उत्कृष्ठ नियोजन
    अमरावती करांचे...
    आभार सुरेन सरांचे..
    जिंकुन आलेत
    चार संजय
    सांगली कोल्हापुर
    तुरकेवाडीचे..
    नागपुरच्या
    माधुरी मॅडम..
    अमरावती चे
    सुर्य किरण..
    सर्वांचे मनपुर्वक
    अभिनंदन...
    सिद्धार्थ मेहेरे
    नागपुर.

    ReplyDelete
  2. संगीत सोहळा
    खुप रंगला सोहळा
    गितांचा..
    पांच आठवड्यांचे
    विजेते गायक..
    पहिल्या पर्वाचे
    बारा गायक..
    होते मैदानात..
    जुळल्या होत्या
    भावना मॅडम..
    काळे सरांनी दिला
    अमुल्य वेळ..
    हिच खरी
    निदेशक सांस्कृतिक
    चळवळ...
    परिक्षकांची
    पण होती कसोटी..
    आयोजकांची
    तारांबळ..
    भुक तहान विसरुनी
    लागली होती हुरहुर...
    उत्कृष्ठ नियोजन
    अमरावती करांचे...
    आभार सुरेन सरांचे..
    जिंकुन आलेत
    चार संजय
    सांगली कोल्हापुर
    तुरकेवाडीचे..
    नागपुरच्या
    माधुरी मॅडम..
    अमरावती चे
    सुर्य किरण..
    सर्वांचे मनपुर्वक
    अभिनंदन...
    सिद्धार्थ मेहेरे
    नागपुर.






    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे