SEASON -02 , INFO AND COMMENTS

 SEASON -02 , FIRST QUADRANT

संपूर्ण रसिक वर्ग नमस्कार , पर्व 2 , फेरी-०१ ,  संपूर्ण सहभाग कलाकार  , या खुली स्पर्धेची सुरवात   दिनांक 03-०8-२०२० सकाळी ०७-०० पासून ते शुक्रवार दि. २8-०७-२०२० सायंकाळी ०५.०० पर्यंत स्पर्धा खुली राहील , ज्या गायकांची या पूर्वी   सहभाग घेण्यात आलेला।आहे त्यांची परत तेच गाणे फक्त आपल्या group mentor यांचे सोबत चर्चा करून अधिक उत्कृष्ट पणे सादर करायचे आहे  , व या स्पर्धे मध्ये नवीन स्पर्धाकाना पण सहभाग घेता येईल फक्त एका ग्रुप मध्ये सहभागी व्हावे लागेल ,  ज्या जोमाने आतापर्यंत प्रतिसाद व आनंद आपण अनुभवला आहे , त्याच उत्साहात या आठवड्यात पण कलाकारांनी आपल्या गाण्याचा सराव , प्रथम ऑडिओ ऐकावं व नंतर विडिओ you tube तयार करून ग्रुप व google Form मध्ये आपणास सादर करायचा आहे , स्पर्धा चे गाणे दिनांक 27.08.2020 गुरुवार व  दिनांक 28.08.2020 शुक्रवार  सायंकाळी 05.00 पर्यंत आहे , या दिवशी ग्रुप वर आपले मेंटर यांचे माध्यमातून अपलोड करायचे आहे ,  संपूर्ण संगीत प्रेमी याना विनंती कि कलाकारांनी सादर केलेल्या सादरीकरणाला कृपया प्रतिसाद द्यावा , सदर चरण कोणतेही थिम नाही आहे   , मागील आठवड्या तील सहभागी कलाकारांनी आपले सहभाग प्रमाणपत्र https://nsc-suren.blogspot.com/ या पोर्टल वरून प्राप्त करावे  अजून काही शंका असेल तर कृपया स्वागत आहे , अधिक माहिती करीता , https://nsc-suren.blogspot.com/ संपूर्ण डिजिटल व्यासपीठ , निदेशक सांस्कृतिक चळवळ चे अधिकृत , वेब पोर्टल ,  नवीनतम व अदयावत स्वरूपात आपल्या हौशी कलाकारासाठी ,  महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION , संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आपणासमोर मांडण्याचा एक प्रयत्न्न , या मध्ये स्पर्धेची नियमावली , स्पर्धकाची यादी , निकाल , NSC CODE यादी  , संपूर्ण स्पर्धेची  YOU YUBE , सहभागी कसे व्हाल ? या विषयी संपूर्ण माहिती या अधिकृत वेब पोर्टल वरच मिळेल  , कृपया , सर्व सभासदांनी नोंद घ्यावी , धन्यवाद  धन्यवाद ,  आयोजन समिती , NSC 

 

 COMMENTS

लक्ष्मण जाधव.
आयटीआय औंध (मुलींची) पुणे.

 आज ज्या सहकाऱ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या त्या सर्वांचा व ज्यांनी माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांची गाणी ऐकुन प्रतिसाद (ज्यांनी गाणे ऐकले व त्याचा मनमुराद आनंद लुटला त्यांनी प्रतिक्रिया जरी दिल्या नाहीत तरीही त्यांचं प्रेम आमच्यावर ती सदैव आहे हे आम्ही अंतकरणापासून मानतो म्हणून प्रतिक्रिया द्याव्यात असे काही नाही ही विनंती)  दिला व ज्यांनी मनापासून गाणी ऐकली त्या सर्वांचा मी आपलाचं एक सहकारी म्हणून हृदयापासून खुप खुप आभारी आहे.आपल्या सुंदर प्रतिक्रियेमुळे एक उभारी येत असते.शेवटी जीवनामध्ये काय आहे..हो.जो आला.... तो रमला... आणि शेवटी गेला...
 कारण...
 **पुसणार असेल कोणी तर, डोळे भरुन यायला अर्थ आहे....
 कुणाचेचं डोळे भरणार नसतील तर, मरण सुद्धा व्यर्थ आहे**
 आपल्या प्रतिक्रिया पाठिंबा आणि वरदहस्त नेहमी या ग्रुपमधील सर्व गायक कलाकारांच्यावरती रहावा.ही अंत:करणापासून प्रेमळ अपेक्षा.

नेहमीप्रमाणे आजही मनाला उभारी देणार्‍या खूप खूप चांगल्या कॉमेंट्स मिळत आहेत. आपण अशाच प्रेरणावर्धक कॉमेंट्स देऊन एकमेकांचा उत्साह द्विगुणीत करुया. व निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या व्यासपीठावर आपण या मंचाला उच्चतम पातळीवर घेऊन जाऊया... पुन्हा एकदा प्रतिसाद देणाऱ्या व मन लावून प्रतिसाद न देताही मनापासून गाणे ऐकणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद

निदेशक सांस्कृतिक चळवळ नियोजन समितीचे प्रथमता अभिनंदन.पर्व-2 मध्ये सहभागी कलाकारांसाठी पहिल्या चरणा पासूनच घेतलेला हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे.जेणेकरून स्व:चुका या प्राथमिक अवस्थेतचं दुरुस्त होऊन कसदार गाणे स्पर्धेमध्ये येईल. पर्व एक मधील विजयी स्पर्धकांना याठिकाणी मार्गदर्शक म्हणून नियुक्त करून त्यांच्या मानसन्मान बरोबरच त्यांच्यावरती जबाबदारीची जाणीव वाढवून एक प्रकारे भरभरून कौतुक केले आहे. आपल्या सहकारी बांधवांना चांगल्यात चांगले मार्गदर्शन करून संघटनेमध्ये गुणवान, गुणवंत कलाकाराची निर्मिती करण्यास ते एक प्रकारे पायाचा दगड बनतील व सांस्कृतिक चळवळीचे शिखर दिमाखात चमकेल अशी प्रेमळ आशा...

 श्रीयुत अशोकजी भिसेसर,एक दिलदार व्यक्तिमत्व ...
स्वतः अनेक गीत गाऊन दुसऱ्यांचे यथेच्छ मनोरंजन करणारे,दुसऱ्यांना आपल्या अचूक निरीक्षणाने समोरच्याने गायलेल्या गीतातील बारकावे अभ्यासून अनोख्या खुबीने कॉमेंट्स देऊन थोडं फिलिंग हवं अशी प्रेरणा देणारे , समोरच्याची काळजी करणारे.. एकाच वेळी एकच ध्येये ठेवण्यापेक्षा, हजार ध्येय ठेवा.तरच तुम्ही यशस्वी व्हाल व इतिहासही घडवाल... असं हे आपल्या ग्रुपमधील बहुरंगी बहुविधगीतं सादर करणार व्यक्तिमत्व खरंतर निदेशक संस्कृतिक चळवळीच्या आयोजकांनी एक वेगळा विचार करून सरांचा सन्मान म्हणून एक मानचिन्ह स्वरूप प्रमाणपत्र द्यावे व माझ्या या छोट्याशा विनंतीला ग्रुपमधील बहुसंख्या सहकाऱ्यांनी पाठिंबा स्वरूप अनुमोदन द्यावे ही माफक अपेक्षा. भिसेसर गात रहा.... गात रहा.... गात रहा.... पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन
आपला सहकारी,
 लक्ष्मण जाधव.
 आयटीआय औंध पुणे
आपला सहकारी.
 लक्ष्मण जाधव.
आयटीआय औंध (मुलींची) पुणे.

श्री . आनंदे संजय शिवाजी IT. I सांगली

 N S C निदेशक सांस्कृतीक चळवळ पर्व-२ मध्ये सहभागी सर्व गायकांचे मनःपुर्वक अभिनंदन ..
      सर्व विभागातून सर्वानी भाग घेऊन आपली गायकी छानपैकी सादर केली .. बऱ्याच जणांनी अतिशय सुंदर गाणी . जी रसिकांना हवी असणारी ' काही भुले बिसरे गीत ' काही आठवणीतील गाणी सादर केली. व NSC ग्रुप माध्यमातुन आपली कला व गाण्यांचा आनंद स्वतः घेऊन दुसऱ्यांना देखील आनंद दिला. त्या बदद्ल सवीचे आभार ... तसेच सर्वानी छानपैकी अभिप्राय  देऊन उत्साह वाढवला .. मागील पर्व - १ मधील माझ्या सहकारी मित्रांनी देखील अतिशय सुंदर गाणी सादर करून पर्व - 2 मध्ये नक्कीच रंगत आणलेली आहे.
  ही  NSC चळवळ  अशीच बहरत राहु दे . : . . ह्याच आज गणेश चतुर्थी च्या निमित्ताने सर्वाना मनःपुर्वक शुभेच्छा🌹🌹🌹🌸🌸🌺🌺💐💐 आणि NSC संयोजकांचे मनःपुर्वक आभार
      श्री . आनंदे संजय शिवाजी IT. I सांगली

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे