निमित्त पर्व दुसरे , मान्यवरांच्या / निदेशक गायक यांच्या निवडक प्रतिक्रिया : -

 निमित्त पर्व दुसरे , मान्यवरांच्या प्रतिक्रिया : - 


SUREN R BHANDE , MOZARI 

निदेशक सांस्कृतीक चळवळ 🙏🙏🎼🎼चा उद्देश फक्त गाण्याची स्पर्धा ,  घेणे एवढा नसून  स्पर्धेच्या निमीत्त आपल्या मधील असलेल्या 🎤कलागुणांना अधिकाधिक वाव मिळून उत्कृष्ट सादरीकरण 🎼🎹होणे  आहे. पर्व 1 , पर्व 2 च्या आयोजनानंतर , 💐💐पर्व 3 साठी ,  नवीन कलाकार यांचा सहभाग आवश्यक , त्यासाठी काही अडचण असल्यास कृपया नेमून दिलेल्या ग्रुप मेंटर सोबत आपण गाण्याची निवड , रेकॉर्डिंग🎤 सर्व तांत्रिक बाबी करीता संपर्क करू शकता , तसेच स्पर्धा चालू नसतांना आपण रोज एक गाणे , सराव म्हणून ,  आपल्या हक्काच्या 🎹🎻💞nsc ग्रुप वर अपलोड करू शकता , संपूर्ण माहितीसह , तसेच काही सूचना असल्यास स्वागत आहे ,  धन्यवाद


RANJAY DALVI SIR , SATARA 

निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या संजय कोळी सर आणि संजय कलोशे सर या बिंनीच्या जोडीची मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर जबरदस्त बॅटिंग 👍👍

बेखुदी मे सनम... संजय कोळी...चौकार

सुनो ना सुन लो ना... संजय कलोशे.... चौकार

एक ना एक दिन ये कहानी बनेगी तु मेरे सपनो की राणी बनेगी... संजय कोळी.. षटकार

चांद तारे तोड लाऊ... संजय कलोशे....षटकार

ओ माय लव्ह... संजय कोळी... चौकार

 तेरी आंखोके सीवा दुनियामे रखा क्या है.. संजय कोळी... षटकार

लेकर हम दिवाना दिल... संजय कोळी...चौकार

गोरी तेरा गाव बडा प्यारा... संजय कलोशे...षटकार

आणि विजयजी, रेखाजी या कलाकारांची सुद्धा नेत्रदिपक बॅटिंग 👍👍

ये तो है भाई निदेशक सांस्कृतिक चळवळ का कमाल 👍👍✊✊फडका दिया अपनी चळवळ का झेंडा मुंबई के पिचपर 🤝🤝✅✅💯💯💯💯💯

गुरुवर्य संजय कोळीजी, गुरुवर्य संजय कलोशे जी बहोत बहोत अच्छा परफॉर्मन्स आपका 🙏🙏फक्र से हम कहेते है की आप निदेशक सांस्कृतिक चळवळ के गुरुवर्य हो 🙏🙏👏👏

निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो 

दिवस सुगीचे...एनएससीचे...🎼 लक्ष्मण जाधव.🙏🏻

आय.टी.आय.औंध,पुणे  

🏝️बऱ्यापैकी आपल्या सर्वांचं  बालपण गावातलं. शेतीमातीला घट्टपणे बांधलं गेलेलं. मातीतं, पाटाच्या पाण्यातं, झाडांच्या अंगाखांद्यावर खेळलेलं. तिथंच वाढलो, बागडलो. पांदीला-झाडाझुडपात मधाची पोळी शोधली. माळांला गायी-गुरं राखली. विहिरीत/नदीचं पोहलो. हूरडा भाजला. चिंचा, पेरू, आंबं, जांभळं, बोरं खाल्ली. चिखलाचे बैल केले. चिपाडाच्या बैलगाड्या केल्या. चिमण्या पाखरांचे आवाज ऐकले, गाई-म्हशींच्या पाठीवर बसून मिरवलो. बैल धुतले, कुळव नांगर चालवला. हे करताना हे सगळं घट्टपणे माझ्याव तुमच्या जगण्याचा भाग झालं. त्याशिवाय जन्मच अपूर्ण झाला. ती काळी ढेकळं, हिरवी डोलणारी पिकं, पिवळी होत चाललेली कुसळं, पाण्याने भरून वाहणारे पाट हे सगळं नकळतं माझ्या/तुमच्या जगण्याशी जोडलं गेलं.आसपासच्या शिवरातून राखणीचे आवाज आले की जुन्या आठवणी पाखरांसारख्या येतात.

             संक्रात होऊन गेलीकी,सारं शेतं शिवारं नजर लागावी अस  हिरवंगार झालेलं असतं.

अगदी आज असंच झालं...

निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या संजयजी कोळीसर व संजय कलोशे या जोडींची व त्यांच्या सहकाऱ्यांची आज मैत्री दिनानिमित्त... बेखुदी मे सनम... सुनो ना सुन लो ना...एक ना एक दिन ये कहानी बनेगी तु मेरे सपनो की राणी बनेगी... चांद तारे तोड लाऊ...ओ माय लव्ह...तेरी आखोंके सीवा दुनियामे रखा क्या है.. लेकर हम दिवाना दिल...गोरी तेरा गाव बडा प्यारा... अफलातून गीताचा कार्यक्रम सादर केला. खूप खूप अभिनंदन. त्याच बरोबर पर्व दोन अंतिम फेरीसाठी आपली अप्रतिम गाणी सादर करणारे/व काहीजण करणार आहेत.ते माझे सहकारी...

श्री.प्रभाकर निलजेसर...श्री.संदीप नवरखेडेसर...

श्री.रंजय दळवीसर...श्री.अनिल काळेसर...श्री.आशिष खरातसर...श्री.विजय मानकरसर...श्री.श्रीकृष्ण रेवस्करसर...श्री.सतीश मोगरकरसर...श्री.शशांक पाटीलसर...श्री.गणेश पापडेसर...श्री सुरेन भांडेसर...श्री.राजेश कांबळेसर...श्री.अजय कनोजेसर...श्री.शिवाजी हांडेसर... काय बोलू या सहकाऱ्यांच्या अप्रतिम गायकी संदर्भात...पाऊसकाळ चांगला झालाकी, विहीरीने/नदीने मुबलक पाणी पोटात घेतलेलं असते. पेरलेल्या रानातं पीक जोमात आलेली असतात. कष्ट करणाऱ्यांच्या, राबणाऱ्यांच्या घामाला मातीने न्याय दिलेला असतो. काळ्यामातीत हिरवी पिकं नजर लागावी अशी बहरून येतात. अगदी तद्वतं आज प्रकर्षाने जाणवले. याच बरोबर आपल्या गायकीने एक वेगळा ठसा ऊमठणारे सहकारी...

प्राजक्ता गायकवाड मॅडम...श्री.जयंत पाटीलसर...श्री.अशोक भिसेसर...श्री.सिद्धार्थ मेहेरसर...श्री.प्रकाश कापसेसर... सौ.ऊपरे मॅडम...सौ उगलेमॅडम...श्री.सोदेसर...श्री.नाना देसलेसर... श्री गवईसर.. किती किती नावे घेऊ...श्री.अजयजी जाधवसर..श्री.संजय जाधवसर व श्रीयुत आनंदेसर...

रानातंल्या पिकांसोबत बांधावरीलं झाडे सुद्धा माझ्या तुमच्यासारखी रुबाबात उभी असतात...त्यांचा डामडौल काही औरचं असतो. पावसाच्या पाण्याने त्यांना नवा तजेला आलेला असतो. अगदी आज मन भरून आलं...अप्रतिम गायकीचं हे अप्रतिम व्यासपीठ अगदी उच्चतम आहे.याचं सर्व श्रेय माझे प्रिय सहकारी सूरेनजी भांडेसर यांच्या अहोरात्र कष्टाला खरोखर जाते.त्याचबरोबर निदेशक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी रुजलेलं हे छोटसं रोप आता प्रचंड वटवृक्ष झालेला आहे.ज्याच्या थंडगार सावलीमध्ये आपणं सर्वजण बागडत आहोत...आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा मुलं-बाळं, बऱ्यापैकी योग्य मार्गाक्रम करीतआहेत.आपले जगरहाटीचे भले बुरे अनुभव घेऊन झालेले आहेत, त्यावेळी उदासीनता येण्याऐवजी,आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचे बळ निदेशक सांस्कृतिक चळवळीमुळे मिळते. याउपर आनंद तो काय?

पुनश्च: सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा.🌹

आपला सहकारी,

NSC-41.लक्ष्मण जाधव.🙏🏻

आय.टी.आय.औंध,पुणे


SHIVAJI HANDE SIR , NASHIK 

सर्व मान्यवर परीक्षक , मेंटोर गुरू,प्रोत्साहन देणार बंधू भगिनी,मित्र वर्ग यांच्या हृदयात आमचे गायन पसंद झाले व आपणा सर्व मुळे या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचलो त्या बद्दल खूप खूप आभार व धन्यवाद🙏🏻💐🙏🏻💐अंतिम फेरीत sound system विकत घेऊन नक्की चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करूया.या दरम्यान कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏🏻आपल्या मनात घर करू शकलो व अनेक मित्र मिळाले 🤝🏻🙏🏻💐काही लिखित शब्द वापरून प्रोत्साहन देणार श्री लक्ष्मण जाधव सर व निरंजन सर यांचे आभार.अहोरात्र झटणाऱ्या सौ भावना ताई,गुरू काळे सर गायन परिवार एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणे श्री भांडे सर खूप खूप धन्यवाद व आभार. माईक साठी आग्रह करणारे अजय सर,कोळी सर, अनंदे   सर आभार,ट्रॅक पाठविनारे हृदयनाथ सर आलाप दुरुस्ती साठी मार्गदर्शक संजय जाधव सर धन्यवाद🙏🏻🤝🏻💐mogarkar सर धन्यवाद.सर्व ज्येष्ठ धन्यवाद🙏🏻



SANJAY KOLI SIR  , KOLHAPUR 

NSC वरील सर्व गायक कलाकारांचे मनापासून धन्यवाद👏🏻 आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हाला आणखी थोडीशी एनर्जी मिळते. असेच प्रेम बधु भाव राहु दे. ग्रुपमधील बरेच सभासद सदरचा लाइव्ह प्रोग्राम उदा.एल एम जाधाव सर,सुरेन भांडे सर ,मोगरकर सर , रंजन दळवी सर, अशा बऱ्याच  गायकांनी पाहीला व सर्वात जास्त काँमेंट्स आम्हा सर्वांना पडल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचे माझ्या टिमतर्फे मनापासून आभार मानतो. 👏🏻

निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो.


           



दिवस सुगीचे निमित्ताने  निदेशक सांस्कृतिक चळवळ🙏 प्रतिक्रिया ✍️✍️परंपरा कायम राखत श्री एल एम सरांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखणी मधून 🎹🎼निदेशक सांस्कृतिक चळवळीला आभाळभर माया💞💞 नेहमीच मिळाली आहे आपण बालपणापासून ज्या संस्कृतीमध्ये वावरत आलेलो आहे , त्या संपूर्ण संस्कृतीचा✍️✍️ अभ्यास पुर्ण लेख सर्वांनी आपल्या समोर असलेल्या  सुगीच्या दिवसात प्रमाणे वावरत आलेलो आहे त्या संपूर्ण संस्कृतीचा अभ्यास पुर्ण लेख सर्वांन समोर मांडला आहे ,  💐💐शेत-शिवार , हिरवे रान , बांध अशा विविध पूर्ण शब्दप्रयोग करून आपल्या 🎼🎹संगीतमय क्षेत्राला सुद्धा निसर्गातून धडा घेऊन योग्य मार्गक्रमण करण्याचा 🎼🎹योग्य दिशा दिलेली आहे परंपरा जोपासत असताना सणासुदीचा उल्लेख करून 💞💞मैत्री दिन असो प्रेम दिन आपण सर्व गायक कलाकारांनी निदेशक सांस्कृतिक चळवळ या💐💐 वटवृक्षा चा आस्वाद घेत आहात असे सरांच्या लिखाणामधून स्पष्ट जाणवतो अनेक महत्वपूर्ण बाब हि कि वैयक्तिक🎤🎻 गायक कलाकारांचे नावानिशी गाणे व प्रोत्साहन देणे ही ही संस्कृती खरंच आहे फक्त आपल्याच व्यासपीठावर🎼🎻🎤💐 पाहायला मिळते स्पर्धक गायक असो की प्रतिस्पर्धी सर्वांना प्रतिक्रिया देणे व स्वतः पण आनंद देणे ,   सुरुवातीपासून आलेल्या संपूर्ण अनुभवासारखा लेखाजोखा ✍️🎯🎯सह एका विशिष्ट उंचीवर तसेच सांस्कृतिक चळवळ मानाने डोलत , याचे आपण पण गुरुवर्य म्हणून साक्षीदार आहात सर जी , सलाम आपल्या प्रेमापोटी केलेल्या संपूर्ण भावनाशील ✌️💞🎻✍️लिखाणाला , धन्यवाद सर जी , NSc-05 , सुरेन आर भांडे , मोझरी , गुरुकुंज , जय निसांच*





सौ वर्ष भरणे मॅडम , 

अगदी बरोबर सर... स्पर्धा वाटतच नाहीये... इतकी सुंदर गाणी विविध गायकांच्या सुमधुर आवाजात व सुरात आम्हाला ऐकायला मिळत आहेत.. आमच्यासाठी तर हि पर्वणीच आहे..

आणि खरं तर जो संगीताचा दर्दी असतो नं त्याला स्पर्धेशी काहीही घेणं देणं नसतो.. तो गातो स्वतः च्या आनंदासाठी..

माझी तर अशी धारणा आहे की परमेश्वरापर्यंत पोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे गाणं..

आपण सगळं काही विसरून त्या स्वर धारे मध्ये न्हाहून जातो..

आणि हाच अनुभव आता आपण सगळे घेत आहोत..


वाह... क्या बात हैं सर...

भावना emotions स्वरामध्ये ओतून कसं गावं याचं इतकं सुंदर उदाहरण तुम्ही हे गाणं गाऊन दिलं आहे..

गाण्याची सुरुवात झाली आणि आपल्या सुमधुर सुरांनी अंगावर शहारा उभा राहिला..

आणि जसं जसं गाणं पुढे गेलं तसं तसं शब्दांपेक्षा तुमच्या सुरांमध्येच मन रमून गेलं..

गाण्याच्या आत्म्याला अगदी ओळखून ते गाणं गाता तुम्ही..

नकळत कधी डोळे भरून आले ते कळलंच नाही..

खुप सुरेख सर...

इतका मखमली आवाज इतका  व्याकुळ करून टाकणारा दर्दभरा देखील होऊ शकतो हि परमेशची देणगी आहे तुम्हाला..

असेच गात रहा आणि आमचे कान तृप्त करत रहा.

🙏🙏🙏🙏🙏



🙏🙏🙏🙏

श्री रंजय दळवी सर , सातारा 

अरे मित्रा,,,, चौफेर नजर टाकली तर निलगिरी आणि सागाने नटलेले डोंगर...500 मीटर अंतरावर 12 महिने ओसंडून वाहणारी नदी... उंचीवरून उड्या टाकून सूर मारून पोहण्याचा आनंद देणाऱ्या चार विहिरी... पावसाळ्यात सभोवताली नजर टाकली तर इंद्रायणी, तामसाळ, आंबेमोहर, दोडक, कोलम या जातीच्या भातशेतीनी खुललेले शिवार.... उन्हाळ्यात हिवाळ्यात वाऱ्याच्या झोतावर डोलणारा जोंधळा आणि हुरडा खाण्याची मजा, एका डहाळ्याला किलोभर शेंगा असणारे भुईमूगाचे डहाळे... जांभळे, करवंदे,आंबे कधी विकत घायची वेळ आली नाही.... कोंबडा बवणे हाच घड्याळाचा गजर.... पिंपळ, वड, आंबा अशा महाकाय वृक्षांची घनदाट छाया....... अश्या या सुसमृद्ध खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आहे.... आणि अश्या प्रकारचे वातावरण वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत लाभले असल्याने शब्दांचा कधी अभ्यास करावाचं लागला नाही... गणेश ही ईश्वर देणगी नसून निसर्गाने केलेली किमया आहे 🙏🙏🙏🙏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

श्री. नावरखेडे सर 

सुरेन सरजी आपली NSC प्रती असलेली मेहनत व नवनवीन प्रयोग करून संगीताप्रती असलेली आवड सर्व महाराष्ट्रभर आपल्या व्य.शि.प्र.मधील बांधव व भगिनींना ह्यामाध्यमातुन एकत्रित करण्यास एकप्रकारे मदतचं करतेय व त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देतेय 🙏🙏तसेच आपली सगळी टिम ज्याप्रकारे काम करतेय.... खरंच Hats off to you and your team 👏👏👍👍👌👌🌹🌹🎤🎤🎤🎹🎧🎧 


आभाऴमाया ...💦

जे निरभ्र असते ते आकाश....

आणि...जे भरून येते ते आभाळं...

म्हणूनच निसर्गाच्या,असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ... गत दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेने लावलेल्या निदेशक सांस्कृतिक चळवळ या इवल्याशा रोपट्याचा प्रचंड वटवृक्ष झालाय... याचं गुपित संघटनेचे पदाधिकारी, भावना ताईसारख्या अभ्यासू परीक्षक,भोजराजजी काळेसरांसारख्या दिग्गज्जांकडून मिळालेले प्रेमळ खतपाणी...व सुरेंनजी भांडेसरांची अविरत मेहनत... यामुळेच आपणा सर्वांना मधुर,रसाळ,अप्रतिम गीतरुपी फळांचा स्वाद घेता येत आहे.अशीच निरंतर आभाळमाया आपणास सर्वांवरती अबाधित राहणार आहे.यास्तव मला माझ्या भावना व्यक्त करण्यास शब्दांची गरज पडली नाही. ते अलगत प्रवाहित झाले. या पर्वामध्ये सहकार्‍यांनी घेतलेले अपार कष्ट मेहनत व संगीताप्रति असलेलं अतूट नातं...ही गाणी ऐकताच थेट काळजाला भिडतात....या सर्वांचा आत्मविश्वास एवढा प्रबळ आहे की,

कॉन्फिडन्स कसा हवा...सुतळी बॉम्बसारखा...

वाजला तर प्रश्नच नाही...पण नाही वाजला...

तरी जवळ जाण्याचं धाडसं,कोणी पटकन करत नाही... हे यातुन प्रकर्षाने जाणवलं...

उपांत्य फेरीसाठी सुंदर,अप्रतिम अशी गीत सादर करणाऱ्या सहकाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच...

1. रंजय दळवीसर.. मेरे जीवन साथी....

2 प्रकाश कापसे सर... जब दीप जले आना...

3. प्रभाकर निलजेसर...ऐ सनम जिसने तुझे...

4. सिद्धार्थ मेहेरसर... मेरे नैना सावन भादो. 

5. राजेश कांबळेसर... होशवालों को खबर...

6. सतीश मोगरकरसर... आपके पेहलूमें...

7.अनिल काळेसर... मेरे सरकार आये है...

8.गणेश पापडेसर... जादू तेरी नजर...

9.शिवाजी हांडेसर... आनेसे उसके आये बहार.

10.जयंत काटकरसर... आज मौसम बडा..

11. विजय मानकरसर... मै आया हुं लेके...

12अजय कनोजे सर... मेरे दीलने तडपके जब..

13.आशिष खरातसर... तुहीरे...तेरे बिना मै...

14. शशांक पाटीलसर... गाडी बुला रही है...

15.प्राजक्ता गायकवाड मॅडम...लग जा गले... 

16.नवरखेडेसर... क्या खबर क्या पता...

17. रेवस्करसर... 1.ये दुनिया,ये महफिल...

2. शोधिसी मानवा...

या खेळीमेळीच्या गीतांच्या स्पर्धेच्या(SEASON II) बाबतीत परीक्षकांचा निकाल कोणताही असो.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे...त्यामुळे एकतर यशाचं दार उघडेल नाहीतर... सुंदर अनुभवाचं... पुन्हा नव्या उमेदीने भक्कम उभे राहण्यासाठी... सर्व सहकाऱ्यांना मनःपूर्वक अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

धन्यवाद.🙏🏻

आपला सहकारी,

NSC-41.लक्ष्मण जाधव.

आयटीआय औंध पुणे🌹

आभाळमाया एक नवं संजीवनी  , निदेशक सांस्कृतिक चळवळी करीता आता या पर्व 2 सेमी फायनल  च्या पर्वावर आभाळमाया संजीवनी चे कार्य करत आहेत , फक्त संगीताच्या निरागस सुरां मधून , फक्त संगीत या विचाराने प्रेरित होऊन आपण सर्व मध्ये एक सुरांचे ऋणानुबंध तयार झालेले आहे , त्या मध्ये आपल्यामधीलच कलात्मक भावनेतून लिखाण कार्य करणारे सर्वांची खूप महत्त्वाची भूमिका आहे , या मध्ये प्रथम क्रमांक अग्रेसर असणारे श्री एल एम जाधव सर , गुरुवर्य यांना मानाचा मुजरा , संपूर्ण nsc च्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्ष मध्ये होतांना सर एक भक्कम साक्षीदार आहे व असणार , असाच प्रेरणादायी लिखाण कार्य आपल्या लेखणी मधून घडो , धन्यवाद 🙏🎼🎼🎸🎤🎹🎧💞💞🙏💐💐💐



श्री एल एम जाधव सर , गटनिदेशक , औध , पुणे 

प्रिय,आदरणीय श्रीयुत,सुरेनजी भांडेसर... 🎸

प्रत्येकाचा "आदर" करणे हा तुमच्या स्वभावातील एक बहुमोल सुंदर दागिनाच नव्हे तर एकप्रकारचा रत्नजडित कोहिनूर हिरा आहे.

तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांची आठवण रुपी संकलित गीतं कोणाला कोठेही,केव्हाही ऐकता येतील असा कुबेराचा खजिना आहे...

गर्द अंधारात इवलीशी चांदणी चमकावी... व त्या चांदण्या रात्रीत आपसुक सतारीच्या

तारांवरती चुकुन हात पडावा ...अनं अलगत विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा हेवा वाटेल... मागे वळून पाहिल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी गायलेली आठवणीची गाणी....जरी...

नसे वेगळे सौंदर्य, नसे सरगम देखणी!

फक्त मंगल श्वासात, निंसांचच्याच आठवणी!

जीवन खुप सुंदर आहे फक्त कसं जगायला हवं...

हे तुमच्यासारख्या सहकार्यकडून शिकायला हवं... तुमच्या अहोरात्र परिश्रमाला ह्रद:यातुन... सलाम🙏🏻


श्री भोजराज वा काळे , परीक्षक -------

प्रिय... एन एस सी परिवारातील  सर्व सदस्य गण,                   सप्रेम नमस्कार...

आज तुम्हाला इतका आग्रह नक्की करतो की,संगीत साधना ही नियमीत सरावांनी दिवसेंदिवस  बहरत जाते हे त्रिवार सत्य आहे. कच्या मातीला सातत्याने आकार देत गेलं आणि मनासारखा आकार मिळत गेला की नंतर सुंदर रूप प्राप्त होते. तसच नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक आकार देता येते...मात्र तरीही परिपूर्ण आपण झालो असे होत नाही . दृढ विश्वास,सातत्याने सराव करत गेलं की संगीताच्या मार्गावर कुठे तरी आपण वाटचाल करायला आत्मविश्वासाने तयार होतो.मी या क्षेत्रामध्ये माठ होतो.अभ्यास व नियमीत सारावांनी आता कुठे आपण थोड फार का होईना गान म्हणायला या वयात सुद्धा आपण धाडस करायला हरकत नाही असं वाटते. सरावातील सातत्य हे निश्चितपणे आपल्याला योग्य मार्गावर नेवून सोडतो....हा माझा अनुभव

 

✍🏻ओंजळ-NSCग्रुपची...** 

NSC-41.लक्ष्मण जाधव.

आयटीआयऔंध(मुलींची)

पुणे.🌹

आदरणीय, भोजराजी काळेसरजी. निदेशक संघटनेची मुलुखमैदानतोफ...

गायन क्षेत्रातील आपला अभ्यास,परिश्रम, खूप सुंदर गायन...🎙️

ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो. आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..

म्हणजे खूप दुःख झाले की,आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की, मन हलके झालेचं म्हणून समजा.. आणि कधी एखादा सुलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करतो..

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे.आणि त्याचा विसर पडता कामा नये,असेच पटकन मनात आले.

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊ नये वगैरे वगैरे ह्या विचाराशी विरोधाभास दाखवणारे शब्द प्रयोग आहेत म्हणा...पण आपण नेहमी राजहंस होऊन मोत्यांचा चारा टिपावा असे वाटते.ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि 'पसायदान' मागितले...

आज एन एस सी ग्रुपची निरंतर वाढणारी प्रगती व त्यासाठी अविरत परिश्रम घेणारे निदेशक संघटनेचे पदाधिकारी,मार्गदर्शक, सच्चे शिलेदार व सहकारी यांना सलाम...

परमेश्वरा समोर हात जोडूतो मन भरून आनंदाची अनुभूती झाली.🙏🏻



आसरेड्डी सर गणित निदेशक सोलापूर.

निदेशक सांस्कृतिक चळवळ ह्या प्लॅटफॉर्म वरील माझ्या सर्व प्रिय निदेशक बंधू-भगिनींनी माझ्या गाण्याला दिलेला प्रतिसाद व केलेल कौतुक या सर्वांचे मी सदैव ऋणी राहीन. माझ्या गाण्यात कदाचित काही त्रुटी असतील त्यात मी दुरुस्त करून पुढच्या वेळेस ह्यापेक्षाही उत्तम प्रेझेन्टेशन करण्याचा मी प्रयत्न करीन. प्रतिसाद दिलेल्या प्रत्येक निदेशक बंधू भगिनींचे ह्या ठिकाणी नाव न घेता  सर्वांचे मनापासून आभार मानत आहे. माझे मेंटर श्री संजय जाधव सर यांनीही वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाचे मी आभार मानत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 


 - आशिष खरात , मुंबई ११  

नमस्कार🙏

       मी आशिष खरात, आयटीआय मुंबई ११.

      सर्वप्रथम "निदेशक सांस्कृतिक चळवळ" हा समूह सुरु केल्याबद्दल सर्व प्रशासक, सर्व सदस्य यांचे मन:पूर्वक अभिनंदन 💐आणि धन्यवाद 🙏 

    आपणा सर्व निदेशक मंडळींमध्ये  कमी अधिक प्रमाणात सुप्त गुण असतातच. पण आपल्या रोजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात आपण व्यस्त असल्यामुळे आपल्यातले हे सुप्त गुण, आपल्यातल्या सुप्त कला या सुप्तच राहतात. गाणं हा खरं तर प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदीच कुणी रफी -किशोर किंवा लता-आशा नसलं तरी प्रत्येक जण आपापल्या परीने, आपापल्या कुवतीनुसार गुणगुणत असतो, गात असतो. आणि अशातच निदेशक सांस्कृतिक चळवळीसारखं व्यासपीठ मिळालं तर आपल्यासाठी तो दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. 

त्यासाठी पुनश्च निदेशक सांस्कृतिक चळवळीचे प्रशासक, सर्व सदस्य यांचे मन:पूर्वक धन्यवाद🙏

     या समूहात सहभागी झाल्यामुळे महाराष्ट्रातील निदेशक मंडळींमधल्या अंगभूत गुणांचे दर्शन घडले. विशेष म्हणजे एकमेकांचे कौतुक करुन एकमेकांना प्रोत्साहित करण्याचा गुण दिसून आला. स्पर्धेच्या अनुषंगाने जे मार्गदर्शक लाभले आहेत तेसुद्धा उत्तम प्रकारे, खेळीमेळीने स्पर्धकांना कोणत्याही प्रकारचे दडपण न देता मार्गदर्शन करीत आहेत. समूहाचे प्रशासकसुद्धा सर्वांना छान प्रकारे प्रोत्साहन देत आहेत.त्यामुळे हा समूह म्हणजे एक सुंदर कुटुंबच असल्याची जाणीव होते. एकंदरीतच या समूहाचा उद्देश नक्कीच फळाला येतोय. या समूहाचा वेल असाच बहरत जावो हीच प्रार्थना ! माझ्याकडून समूहास खूप सा-या शुभेच्छा ! 💐💐💐


 - आशिष खरात , मुंबई ११ 




Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे