श्री रंजय दळवी सर , आय टी आय सातारा , यांची पोस्ट अगदी अंतर्मुख होऊन व्यक्त केलेल्या भावना , प्रतिक्रिया ...........

 






||नि. सां. च.||||
श्री रंजय दळवी सर , आय टी आय सातारा , यांची पोस्ट अगदी अंतर्मुख होऊन व्यक्त केलेल्या भावना ...........
आज निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या व्यासपीठामधील मार्गदर्शक, परीक्षक, कलाकार आणि कलाकारांची गीते ऐकुन त्यांना मनसोक्त दाद देणारा श्रोतावर्ग या सर्वांच्या गुगल मीट चे नियोजन करण्यात आले होते.
अतिशय मोठी समाधानाची बाब म्हणजे या मिटिंगला सर्वांचीच उपस्थिती लक्षणीय होती 👍👍ही आपल्या व्यासपीठाची पहिलीच अशी मिटिंग असेल की, मिटिंग मधील सर्वच सहभागी हस्तींनी आपली मते स्पष्टपणे आणि बिनधास्त मांडून अतिशय सुंदर असा सुसंवाद साधला 👌👌नक्कीच आज व्यासपीठाला कलाकारीमधील उच्च स्थान गाठल्याचा साक्षात्कार झाला 🙏🙏या मिटिंगच्या नेटक्या नियोजनाचे सर्व श्रेय अर्थातच व्यासपीठाचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेनजी यांना द्यावेच लागेल 💯💯
व्यासपीठाच्या प्रगतीची तोंड भरून स्तुती करत सर्व परीक्षक, गुरुवर्य, कलाकार सर्वांचेच माननीय बाळापुरे साहेबांनी खुप खुप कौतुक केले 🙏🙏अश्या या व्यासपीठामध्ये सहभागी असल्याचा मला सार्थ स्वाभिमान आहे, आणि उत्तरोतर या व्यासपीठाची खुपच प्रगती होणार आहे त्याची शत प्रतिशत खात्री दिली 👍👍एवढ्यावर ते थांबले नाहीत तर ज्या ज्या ठिकाणी या व्यासपीठाचे लाईव्ह कार्यक्रम आयोजित केले जातील त्या त्या ठिकाणी माझी उपस्थिती असणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली 🤝🤝
या व्यासपीठाचे संस्थापक श्री भोजराज जी काळे सर यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद तर बघण्यासारखा होता 👍👍व्यासपीठाने साधलेली जी अती उच्च प्रगती आहे त्यामुळे त्यांना झालेला परमोच्च आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता 🙏🙏सर्वच कलाकारांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा करत भविष्यात व्यासपीठ खुप मोठे लक्ष्य गाठणार आहे असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर दुसऱ्या पर्वाचा निकाल आठ दिवसात लावून तिसरे पर्व धुमधडाक्यात सुरु करण्याचे सर्व कलाकार कार्यकर्त्यांना आश्वासन त्यांनी दिले 🙏🙏
आपल्या व्यासपीठास लाभलेल्या थोर संगीतनिष्णात परीक्षक सौ भावनाजी मानकर मॅडम यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या संगीत विषयक ज्ञानाचे सर्वच कलाकारांना मनसोक्त वाटप केले 🙏🙏संगीतामध्ये सूर आणि लय या बाबींचे किती महत्व आहे हे सर्व कलाकारांना पटवून देताना स्पर्धात्मक नंबर काढण्याचे सुद्धा कार्य दिवसेंदिवस कलाकारांमधील प्रगतीमुळे आव्हानात्मक होत चालले आहे अशी स्पष्ट कबुली सुद्धा त्यांनी दिली 👌👌💯💯
गुरुवर्य श्री लक्ष्मण जाधव सरानी तर व्यासपीठाची सुरवात ते आत्तापर्यंतचा प्रवास यातील प्रगतीचा पाढाच वाचला 🙏🙏सुरवातीस 90 टक्के स्टारमेकर वर परफॉर्म करणारे सर्वच कलाकार आता माईक हातात घेऊनच परफॉर्म करत आहेत याबाबत त्यांनी खुप समाधान व्यक्त केले 👌👌👍👍
गुरुवर्य श्री संजय कोळी सर यांनी विभागवार स्टेज शो चे आयोजन करता करता एक मोठा शो राज्यस्तरीय झालाच पाहिजे असा मानस व्यक्त केला 🙏🙏
गुरुवर्य श्री अजय जाधव सर,गुरुवर्या सौ बालपांडे मॅडम, गुरुवर्य श्री संजय जाधव सर यांनी व्यासपीठाची प्रगती अतिशय झपाट्याने होत आहे, त्यामुळे स्पर्धात्मक पर्वांचे निकाल लावणे ही सोपी बाब राहिली नाही अशी स्पष्टॊक्ती केली 🙏🙏
आज संघटनेचे शिलेदार मधुभाऊंनी सुद्धा मिटिंगला उपस्थित राहून व्यासपीठाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत सर्व कलाकारांची मुक्त कंठाणे प्रशंसा केली 🙏🙏
मार्गदर्शक संजय कलोशे हे सुद्धा उपस्थित होते पण तांत्रिक अडचणीमुळे ते जास्त काळ हजर राहू शकले नाहीत 🙏🙏तरीही व्यासपीठावर त्यांचा मार्गदर्शनपर वावर आम्हा सर्व कलाकारांना निश्चितच सुखावह असतो 👍👍💯💯
श्री सुरेनजी भांडे सर यांनी आगामी कालावधीत असणाऱ्या नियोजनाबद्दलची रूपरेषा कथन केली 👍👍खरंच या व्यासपीठाला सुरेनजी यांच्या रूपाने एक थोर कार्यकर्ता लाभलेला आहे, ही व्यासपीठासाठी फार मोठी स्वाभिमानाची बाब आहे 🙏🙏🙏🙏
श्री विजयजी मानकर सर,श्री अजयभाई कनोजे, सौ उपरे मॅडम, श्री नागपुरे सर, श्री हांडे सर, श्री बन्सीलालजी, श्री गणेशजी पापडे या सर्वांनी मिटिंग ला उपस्थित राहून आपापली मते व्यक्त केली 🙏🙏
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व परीक्षक, सर्व गुरुवर्य, सर्व कलाकारांच्या सुश्राव्य मनसोक्त गायनाचा कार्यक्रमानंतर मिटींगची सांगता झाली 👍👍
सर्वांचेच
अभिनंदन
आणि मनःपूर्वक आभार 🙏🙏
निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो 👍👍🤝🤝🤝🤝✊✊✊✊💥💥💥💥🎤🎤🎤🎤🥁🎷💃🎶🎸🎹🎺🎧🎯♥️♥️💐💐🌹🌹🌹🌹

प्रिय, बंधू,श्रीयुत रंजय/निरंजन दळवी सर... 
मनांच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की... कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात.एखाद्या भ्रमराला जशी कमळाची आत्यंतिक ओढ असते.. तो त्यातं आनंद शोधतो, तेच आनंद तरंग...या निसांचच्या भक्तीत...पूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सीचे आपण प्रत्येक क्षण आणि क्षण..अगदी मोजक्या शब्दांमध्ये टिपलेला आहे.अप्रतिम...काळजात थेट भिडणाऱ्या सुंदर गायनाबरोबरच थोर लेखणी आहे तुमची... सलाम तुमच्या लेखणीला... तसेच प्रत्येक व्यासपीठावरील गायक सहकार्यांच्या गाण्याला दिल्या जाणाऱ्या उस्फुर्त  प्रतिक्रियेला...
रिश्ते’ और ‘रास्ते’ के बीच... एक अजीब रिश्ता होता है....कभी ‘रिश्तों‘ से ‘रास्ते‘ मिल जाते है, और कभी ‘रास्तों‘ में ‘रिश्ते‘ बन जाते हैं... जैसा की अब NSCके माध्यम से हो रहा है...
इसीलिए चलते रहिये,और रिश्ते निभाते रहिये....
खुशियाँ तो चंन्दन की तरह होती हैं, दूसरोंके माथेपे लगाओ,तो अपनी उंगलियाँ भी महक जाती हैं...
धन्यवाद बंधू...असेच निरंतर गात रहा, लिहित रहा..✒️
NSC-41.लक्ष्मण जाधव
आयटीआय औंध पुणे🌹


दुसरे पर्व यथायोग्य संपले 👍👍👌👌कालच व्यासपीठावरील सर्वांची गुगल मिटिंग सुद्धा यशस्वीरित्या पार पडली 👌👌💯💯
असे वाटले नि. सां. च. चे गुरुवर्य, मार्गदर्शक, कलाकार, डायरेक्टर सर्व जण जरा विश्रांती घेतील..... पण हे थांबतायेत कुठे!!!! नसानसात नि. सां. च. चे वारे घुसलेले हे सर्वजण परत सुसाट सुटले 👍👍याला म्हणतात व्यासपीठ आणि यालाच म्हणतात उर्जितावस्था ✅✅💯💯
मिटिंग संपल्या संपल्या गुरुवर्य संजय कोळी सरांना काय ताकत आली कोणास ठाऊक!!लगेच पॅरिस ला पोहचले आणि 'अँन इविनिंग इन पॅरिस मधील ' रात के मुसाफिर हे गीत अतिशय मस्त आवाजात त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये गाऊन झाल्यावरच ते शांत झाले 💞
व्यासपीठाचे वातावरण पाहुन भारावलेल्या बाळापुरे साहेबांनी सुद्धा जास्त वेळ न दवडता, त्यांच्याकडे असलेल्या जुन्या हिट गाण्यांच्या कोठारामधून एक जुने हिट गीत बाहेर काढले "कोई और दुनिया मे तुमसा हसी है "व्यक्तिमत्वास साजेसा पेहराव चढविला (चॉकलेट हिरो देवानंदजी सारखा ) आणि मस्त आवाजात गीत गाऊन मोकळे झाल्यावरच त्यांना बरे वाटले असेल 👌👌🎤🎤💯💯
गुगल मिटिंगला तांत्रिक अडचणीमुळे न गाऊ शकलेले सुरेनजी यांना स्वस्थ बसविते कुठले?? काही तरी दिवसात चुकल्यासारखे वाटायला लागले त्यांना... आणि स्वस्थ बसतील ते सुरेनजी कसले?? मस्त आवाजात " समा है सुहाना सुहाना " हे गीत मस्तपैकी त्यांच्या स्टाईल मध्ये गाऊन झाल्यावरच ते शांत झाले 👌👌❤💯💯
अजयभाई तर अलीकडे खुपच फॉर्म मध्ये आहेत 👍👍शतकावर शतक लावायचा सपाटाच त्यांनी चालू ठेवला आहे 👍आणि ते ही नजाकतभरी ड्राईव्ह असलेले 💯💯काल त्यांनी " तु मेरी जिंदगी है " हे कुमार सानुजींचे गीत अतिशय अतिशय अप्रतिम गायले 🎤🎤👌👌❤❤
भिसे सर यांच्या बाबतीत एक शोध लावणे फार अवघड आहे.... यांना एवढी जुनी गाणी कशी माहित आहेत?? आणि त्यांच्या चाली सुद्धा कश्या माहित आहेत?? खरंच कोपऱ्यापासून दंडवत आपणास भिसे सर जी 👏👏आपण या व्यासपीठावरचे अजीब रसायन आहात 💯आणि गाणे सुचले की ते आणि दादाजी उर्फ शशांक पाटील सर जी जास्त वेळ वाया न घालविता लगेच गाऊन मोकळे झाल्यानंतरच मग मोकळा श्वास घेतात 😄😄🙏🙏
अलीकडे बन्सीलालजी, परमारजी, सुद्धा खुप खुप चांगली गीते व्यासपीठावर सादर करीत आहेत 👍👍हे तिसऱ्या पर्वासाठी खुप चांगले द्योतक आहे 👌👌💯💯
अश्या सुरेख पद्धतीने आपले व्यासपीठ दिवसेंदिवस फुलतच चालले आहे 👍👍👌👌कालच आपल्या परीक्षक सौ भावनाजी यांनी आपल्या व्यासपीठास मोगऱ्याची उपमा देत " मोगरा फुलला " हे गीत फारच अप्रतिम आणि सुंदर आवाजात सादर केले 👌👌💯💯अश्याप्रकारे निदेशक सांस्कृतिक चळवळ रुपी या मोगऱ्याचा सुगंध महाराष्ट्रभर दरवळत आहे 👍👍आणि तो असाच कायम दरवळत राहणार 💯💯🌹🌹
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या व्यासपीठावर कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांना खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
तसेच व्यासपीठावर निरंतर गाणे सादर करणारे आपल्या सर्वांचे लाडके कलाकार श्री मेतकर सर यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा 🤝🤝💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
🎧🎧🎧🎧🎧🎧🎧
💥💥💥💥💥💥💥💂‍♀️💂‍♀️💂‍♀️💂‍♀️💂‍♀️💂‍♀️💂‍♀️ 
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

 🎸फास्टट्रॅक , निदेशक सांस्कृतिक चळवळ🎸*   🎼🎼💞💐, अगदी सुसाट मेट्रो सारखी धावत आहे ,  💐रंजय सर जी आपले आभार 🙏🙏मानावे तेवढे वेळ , आपल्या ✍️ लिखाण पुढे काय लिहावे हा एक गुढ पडलेला प्रश्न , कारण सर्व काही जसे च्या तसे घडलेल्या घटना आपण आपल्या लिखाण घेऊन मंत्रमुद्ध सर्वाना करत आहात , आज महिला दिन २०२१ निमित्त आपल्या परिवारातील 🎤गायक सौ. सुवर्णा उगले मॅडम , यांनी महिला दिनाच्या कार्यक्रम मध्ये गायलेले गाणे ......... सुरेन आर भांडे , मोझरी 


नि. सां. च.❤❤

"हा सागरी किनारा ओला सुगंध वारा " ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा हो हो हो 🙏🙏

खरंच आपले व्यासपीठ खऱ्या अर्थाने सागरी किनारा आहे, जिथे सर्व भौतिक सुख मिळते 🙏🙏वाऱ्यांच्या मस्त लहरिवर जसा उन्हाळ्यामध्ये जनजीवन सुखावते तशी कोरोनाच्या झळ्यावर आम्हा निदेशक कलावंताना ही लाभलेली उत्कृष्ट सावली आहे हे कदापिही कोणी निदेशक कलावंताने विसरू नये,, हे फार महत्वाचे 🙏🙏

असा काहीही भेदभाव नाही या व्यासपीठावर,, आपल्या कौशल्य विकास आणि उद्योजगता या विभागामधून चतुर्थश्रेणी ते सहसंचालक यापर्यंत कलाकार या व्यासपीठावर सामील आहेत 🙏🙏ही फार स्वाभिमानाची बाब आहे 👏👏संस्थापक,, परीक्षक,,सर्व गुरुवर्य,,डायरेक्टर,, या व्यासपीठावर आपले आपले कार्य इमाने इतबारे करत आहेत 🙏🙏मनामध्ये एकच सर्वांच्या ध्यास आहे की निदेशकामधील कलाकार जागावा 🙏🙏आणि मला किंबुहना वाटते या तर अती उच्च शिखरापर्यंत पोहचलेलो आहे 💯💯धन्यवाद त्या महा मानवाना ज्यांनी ही निर्मिती केली आणि धन्यवाद या महा मानवाना की जे कलाकृती जोपासत आहेत 🙏🙏🙏

❤❤संस्थापक ❤❤

पितामह-भोजराजजी काळेसर 

अध्यक्ष  - महादेवजी माळी सर 

❤❤ परीक्षक ❤❤

संगीत निष्णात सौ भावनाजी मॅडम

मार्गदर्शन - संगीत प्यारे श्री रविंद्र बाळापुरे साहेब 

❤❤गुरुवर्य ❤❤

श्री लक्ष्मणरावजी जाधव सर 

श्री संजय कोळी सर

श्री संजय आनंदे सर

श्री संजय कलोशे सर

सौ, बालपांडे मॅडम

श्री संजय जाधव सर

श्री अजय जाधव सर

श्री किरणकुमार वानखेडे

❤❤कलाकार ❤❤

अनिलजी काळे सर

भिसे सर

शशांक पाटील सर

निलजे सर

रेवस्कर सर

मोगरकर सर

नवरखेडे सर

कापसे सर

आशिष सर

अजय भाई 

गणेश पापडे सर

मेतकर सर

सौ उपरे मॅडम

सौ भरणे मॅडम

सौ उगले मॅडम

श्री जयंतजी काटकर

श्री जयंतजी पाटील

श्री चहंदे सर

श्री राहुल सर

श्री पम्पट्टीवर सर

श्री सोधे सर

श्री राजेशजी कांबळे सर

या व्यतिरिक्त संस्थापक,, गुरुवर्य,, आणि परीक्षक सुद्धा या व्यासपीठावर परफॉर्म करत असतात 🙏🙏

मार्गदर्शक बाळापुरे साहेब आणि गुरुवर्य लक्ष्मणराव जाधव यांच्या गझली कर्णतृप्त 🙏🙏🙏🙏

गुरुवर्य संजयजी कोळी, संजय आनंदे, संजय जाधव, संजय कलोशे यांची गायकी बेहत्तरीन 🙏🙏👍👍❤❤

गुरुवर्या बालपांडे मॅडम यांना गानकोकिळा ही उपाधी दिली ही खरीच आहे 🙏🙏काय मस्त भजन गायले आहे👌👌अगदी मस्त 🙏🙏

सुरेनजी हा तर निदेशक सांस्कृतीक चळवळीचा लखलखता तारा आहे कधी सगळे सांभाळेल आणि कधी गीत गाऊन रिकामा होईल सांगताच येत नाही 👍👍यालाच म्हणायचे कार्यकर्ता 🙏🙏❤❤

भावनाजींचा तर सुंदर गायकीमधून असणारा कंठ आम्हाला कायम हा संदेश देतो की आम्ही भाग्यवान आहोत की अश्या परीक्षक लाभल्या 🙏🙏🙏🙏🙏

सर्व वातावरण कसे समृद्ध आहे👍👍सुक्ष्म रोपट्याचे शानदार वृक्ष्यामध्ये रूपांतर झाले आहे 🙏यामध्ये सर्वांचाच हातभार आहे 🙏🙏असाच बहार कायम फुलत 

सर्वांनी ठेवला पाहिजे ही सदिच्छा 🙏🙏🙏🙏

निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


रुवर्य, गायकीचे पाढे आपणापासूनच आम्ही शिकलो आणि हेच ज्ञान आपणापासून आम्हाला अपेक्षित नाही 🙏🙏का तर मुळ ज्यांच्याकडे आहे त्यांनी आम्हाला फ़ांद्या दाखवायची गरज नाही 💯💯आपल्या सावलीत शिकलो, गायकी मधुन वेगवेगळ्या आवाजाची गाणी गायला लागलो हे ही नसे थोडके 🙏🙏आपण Great आहात प्रत्येक पावलावर माझी सावली आहात, तीच सावली आयुष्यभर मला लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏आणि हो राहिले गाण्याबाबतीत,"तुम अगर साथ देणेका वादा करो "अप्रतिम झाले आहे 👍👍And Dont forget you are founder member of the gayaki and N. S. C. We all Love

नि. सां. च.

निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो 👍👍🙏🙏💯💯❤❤❤❤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤


आज दिन विशेष निदेशक सांस्कृतिक चळवळ --- हा सागरी किनारा ओला सुगंध वारा " ओल्या 💞मिठीत आहे हा रेशमी निवारा हो हो हो 🙏🙏 खरंच आपले व्यासपीठ खऱ्या अर्थाने सागरी किनारा आहे , या निवारा  ठिकाणी विसावणारे  उत्कृस्ट रसिक  आहेत , ज्याच्या  जोरावर  डोलाऱ्यांची उंची दिवेसंदिवस वाढतच आहे , त्या मध्ये सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे , प्रत्येक  🙏रसिक प्रेमी जन यांची या आनंद वारी मध्ये साथ आहेच , आजचे नुकतेच उदाहरण म्हणजेच श्री. कनोजे कुटुंब यांच्या ऋणानुंबंधाला २१ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद , दोघांनी सुंदर युगल गीत गाऊन आपल्या या व्यासपीठ वर सर साक्षीने साजरा केला , सोबत श्री. विजय मानकर व आपल्या मुख्य परीक्षक  मॅडम  सौ. भावना मॅडम , यांनी प्रथमच सोबत ,  मेरे 💞हम सफर हे गीत,  अतिशय प्रभावी पाने सादर केले , आज प्रथमच श्री. एल एम जाधव , सर , मानाने गुरुवर्य , यांनी संपूर्ण तयारी निशी आपले  , तुम अगर साथ देने का वादा  करो  हे सुंदर गीत आपल्या कणखर आवाजात 🎤 छान रित्या सादर केले व  श्री. सतीश  मोगरकर सर यांनी आपण🙏 सर्वाना साथ देत , आपल्या मुलायम आवाजात जगजीत सिंग यांची ,💞 तेरे बारेमे सोचा नही था ?   माझी आवडती गजल सादर केली.


Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे