निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे जागतिक कवी दिन निमीत्त काव्यात्मक प्रतिक्रिया चा वर्षाव करून जागतिक कवी दिन -२०२१ साजरा .........नि. सां .च .

 निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे जागतिक कवी दिन निमीत्त काव्यात्मक प्रतिक्रिया चा वर्षाव करून जागतिक कवी दिन -२०२१ साजरा .........नि. सां .च .  

 श्री. सिद्धार्थजी मेहरे  , नागपूर 

.* आमचे सुरेन *
शब्दांत गोडवा
आवाज ही सुरेल..
असे आमचे
एन एस सी चे
मैनेजिंग डायरेक्टर
भांडेंचे सुरेन..
कोरोनाच्या
संकटाच्या वेळी
सुरू करून
आॅनलाइन
कराओके
गायन स्पर्धा
संपुर्ण महाराष्ट्रात
कमी वेळेत
गाठले
उत्तुंग शिखर..
लॉकडाऊनच्या
काळात
कुठलेही काम
नसतांना
केवळ स्पर्धेकरिता
गित गायचे म्हणुन
व्हायचो सजुन
धजुन तयार...
कोणी मो.रफी
कोणी कुमार सानु
तर कोणी झाले
किशोर  कुमार..
संजय रंजय
अजय अनिल
सतिश आशिष
एकसे बढ़कर एक
गायक झाले तयार..
केला  कमी
हजारोंच्या
मनावरचा ताण..
मग आम्हाला
काय माहीत
को मनसुख हिरेन..
आम्हाला
माहीत फक्त
अन फक्त आमचे
एन एस सी चे
मैनेजिंग डायरेक्टर
भांडेंचे सुरेन..
           सिद्धार्थ मेहेरे
               नागपुर.

श्री. सुरेंन  आर भांडे , अमरावती  , एक निवेदन  निमित्त पर्व ३ 



श्री. लक्ष्मण जाधव. आयटीआय  , औंध ,  पुणे

गाज निसांचचा वेध पर्व-३चे... 🎻

गायकीच्या विविध प्रकाराप्रमाणेच भटकंतीचेही अनेक प्रकार असतात. जो-तो त्याच्या आवडीप्रमाणे भटकंतीचा आस्वाद घेत असतो. आपल्या ग्रुपवर प्रकर्षाने हेच जाणवते.सागराचीची गाज कानांवर येत होती. बेटावरील माडा,पोफळीच्या झावळ्यांची सळसळ ऐकू येत होती. आणि खारट वासाचे ओलसर उत्तेजक वारे देहाला वेटाळून निघून जात होते. निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या पर्व एक पासून पर्व दोन पर्यंतच्या प्रवासातल्या सुमधुर गाण्यांचा आस्वाद सागर किनारी उंच कातळावरून घेण्याच्या तंद्रीत जसा मी होतो. आपण सर्वजण सुद्धा आहात...असं म्हणतात आवाज हा मनाचा आरसा असतो. माणसाच्या भाव-भावना कधी कधी शब्दातून अचूक व्यक्त होत नाही, पण आवाजाच्या किंचित बदलातून... त्या नाजूक कंपनातून अचूक व्यक्त केल्या जाऊ शकतात.समुद्राच्या पाण्यामधून वा त्याच्या पृष्ठभागावरून सरकत पुढे जाणाऱ्या क्षोभाला किंवा खळबळीला 'लाट'म्हणतात. लाटा पासून निर्माण होणाऱ्या या सुमधुर ध्वनीला गाज संबोधले जाते.
लाटेच्या सर्वांत उंच भागला तरंगशीर्ष व सर्वात खोल भागाला तरंगपात ( गर्त ) म्हणतात. या दोन्हीमधील उभ्या दिशेतील अंतराला लाटेची उंची, तर लागोपाठच्या दोन तरंगशीर्षामधील अंतराला लाटेची लांबी वातरंगलांबी म्हणतात. अगदी तद्वत गाण्याचे नोटेशन काढताना व ते गाण्यापूर्वी नुसते स्वरज्ञान असुन चालत नाही, तर गाण्यातील बोल, त्याचा आशय, त्याच बरोबर शब्दांची घनता, आघात, गाण्याला रंगत आणणारा लयपुर्ण ठेका इ. अनेक बाबींचा विचार करावा लागतो.  गाण्यासाठी वापरलेला ताल आणि लय(गती) यांचाही विचार गायन करण्यापूर्वी करावा लागतो.तालांचे ज्ञान असणे आणि त्यातील तालाच्या खुणा माहीत असणे हे  जरुरीचे असते.तालाबरोबरच तालाची गती (लय) विचारात घ्यावी लागते. गाण्यातील ओळीत तालाची गती ही नियमीत आणि एकसारखी ठेवावी लागते. नाहीतर गाणे मध्येच फास्ट्/स्लो असे काहीसे होइल. याचा बॅलन्स ठेवणे यालाच लयीची जाण्/भान असे म्हणता येइल. व हे सर्व या सांस्कृतिक चळवळीच्या व्यासपीठावर पर्व एकच्या प्रवासापासून ते पर्व दोनच्या सांगते पर्यंत मुख्यत्वे जाणवत आहे सर्व सहभागी गायकांची यापूर्वी सादर केलेली गाणी आपण अथवा त्या स्वतः गायकाने पुन्हा पुन्हा ऐकली तर ते आज गात असलेली गाणी यातील फरक निश्चित जाणवेल अगदी जास्त कशाला थोडक्यात समजून घ्यायचा असेल तर...
बायकोच्या एका ‘ अहो ’ या हाकेत...किती वेगवेगळे गर्भित अर्थ आणि सूचना असू शकतात, ते नवऱ्याला विचारा. ती हाक प्रेमळ आहे की,धमकी आहे की, याचना आहे.याच्यावर पुढच्या सगळ्या संभाषणाची मानसिक तयारी केली जाते.याच प्रमाणे सर्व गायक सहकाऱ्यांनी आपली गाण्यातील विविधता, गोडवा व प्रगती साधली आहे. याचं सर्व श्रेय निदेशक संघटनेने उभ्या केलेल्या या व्यासपीठाला जाते. पर्व-३ स्वर सुमनांची भरभरून उधळण करणारे, निष्णात गायकांप्रमाणे सहभागी कलाकारांच्या गाण्यांचा कस काढणारे असणार आहे,यात तिळमात्र शंका नाही.
सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपली सुप्त कला सादर करावी.ही अंतकरणापासून अपेक्षा.🙏🏻

प्रिय,आशिष खरातसर,
VOICE IS A REFLECTION OF ONES SOUL!
जीवन सुंदर तर आहेच...पण ते अर्थपूर्णही आहे.
दमदार लेखणी,व कविता...गायन... खूप खूप भावले.असेच निरंतर लिहीत रहा...गाणं रहा...आपला सहकारी,

NCC-41 लक्ष्मण जाधव.
आयटीआय औंध पुणे




"हे सुरांनो मुक्त व्हा..."  , आशिष खरात , मुंबई 

          प्रत्येकाची "आनंदाची परिभाषा" वेगवेगळी असते. कलेवर निस्सीम प्रेम असणा-याला निश्चितच कलेतून निर्लेप आनंद मिळतो. त्यात संगीत म्हणजे स्वर्गीय आनंदाची अनुभूती... सुरांच्या अद्भुत विश्वात उन्मुक्तपणे विहार करणा-यालाच उमगतं सुरांची किमया काय असते ते !...तिमिरातून तेजाकडे...शुष्कतेतून ओलाव्याकडे... अर्थातच नैराश्याच्या गर्तेतून आशेकडे नेणारी एक अदृश्य तरल लहर म्हणजे संगीत ! अशा या संगीताच्या जादुई दुनियेत मन रमत नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळच. ( आणि अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला अभागी म्हणावे लागेल.) सूर, ताल आणि लयीची ही सफर खरोखरच रोमांचक असते.आपल्याच नकळत आपल्याला अलवारपणे  या स्थूल जगातून सूक्ष्म अवकाशात  घेऊन जातं ते संगीत ! आपण सगळेच या सफरीतले स्वच्छंदी मुसाफिर आहोत. निसांच नावाचं गलबत अविरतपणे आपल्याला ही सफर घडवित आहे. 
               दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्या घरी आल्यावर जो आल्हाद आपल्याला लाभतो तीच जाणीव निदेशक सांस्कृतिक चळवळ ह्या परिवारात आल्यावर मिळते. निसांचच्या सर्वच सदस्यांची संगीताप्रती असलेली आत्मीयता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. माझं गाणं हे गुणगुणण्यापुरतंच सीमित राहिलं होतं. पण निसांचमध्ये आल्यानंतर जाणीवपूर्वक मी वेळ देऊ लागलो. ही ऊर्मी माझ्यात निर्माण झाली ती निसांचमुळे!...आपल्या कंठात रुंजी घालणा-या या सुरांचा मला नव्याने परिचय झाला तो निसांचमुळे!... संगीतातलं पारदर्शी मैत्र लाभलं तेही निसांचमुळे!  सुरांचं हे जग अपरिमित आहे. संगीताचे पंख लेऊन या असीम आकाशात मनसोक्त विहार करण्याची धुंदी काही औरच आहे! 
                  सुरांचं लेणं लाभलेल्या प्रत्येकानं या आकाशात विहार करण्यासाठी यावं आणि आपल्या सुरांची पखरण करावी. अव्यक्त असलेल्या आपल्या सुरांना मुक्त होऊ द्यावं.कारण हा आनंद अद्वितीय आहे. 🙏       
                 सप्तसुरांच्या हिंदोल्यावर
                 भान विसरुनी मुक्त झुलावे 
                 झुलता झुलता अवघे जगणे
                 एक सुरीले गाणे व्हावे... 

                 | आशिष खरात |





श्री. रंजय दळवी , सातारा 

तिसऱ्या पर्वाच्या दणदणीत आणि दिमाखदार वाटचालीकरिता अतिशय सुंदर निवेदन सुरेनजी 👍👍👌👌🤝🤝💯💯
सर्व जुन्या आणि नव्या कलाकारांना सामील करून तिसरे पर्व हे उत्कृष्टरित्या पार पडणारच आहे यात काही तिळमात्र शंका नाही 👍👍
कृपया पहिल्या पर्वामधील, आणि दुसऱ्या पर्वातील जुन्या जाणत्या अनुभवी कलाकारांना आणि नवोदित कलाकारांना एक नम्रतेचे विनंतीवजा आव्हान असे आहे की जे कलाकार सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांनी आपले नाव आणि संस्थेचे नाव देऊन " होय मी सहभागी होणार आहे " असा संदेश ग्रुपवर सादर करावा 🙏🙏
जास्तीत जास्त कलाकारांनी या पर्वामध्ये सहभागी होऊन या व्यासपीठास चार चांद लावावेत आणि तिसरे पर्व पहिल्या दोन पर्वापेक्षाही दणदणीत साकार करावे ही नम्रतेची विनंती 🤝🤝✊✊💥💥🎤🎤
तरी कृपया लवकरात लवकर आपला सहभागी होण्याचा होकार आपल्या पूर्ण माहितीसाह व्यासपीठावर सादर करावा ही नम्रतेची विनंती 👏👏👏👏
  ||| निदेशक सांस्कृतिक चळवळीचा विजय असो |||

सुरेनजी आपण कार्यरत असला की मी काहीही चिंता करत नाही 👍अपघात झाल्यामुळे दोन दिवस दवाखान्यात होतो,, आता सोडले आहे,घरी आहे, पायाला जखम असल्यामुळे शांत होतो 🙏या कालावधीमध्ये काही माझ्या मित्र कलाकारांना प्रतिक्रिया देऊ शकलो नाही त्याबद्दल प्रथम क्षमस्व 🙏🙏या व्यासपीठावर माझे नितांत प्रेम आहे ही काळ्या दगडावरची रेषा 💯💯बाकी राहतात थोड्याश्या बाबी कलाकारी मधुन शिल्लक!! हे व्यासपीठ कलाकारी मधुन आहे, कोणाची मर्जी सांभाळायचे म्हणून नाही 💯💯या ठिकाणी आपल्या स्वछंदी गायकीचा आस्वाद घ्यायचा 👍👍खरं तर हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने गायकीमधून प्रभावी झाले आहे 💯💯भावना मॅडम यांच्या परीक्षकाच्या भूमिकेतून हे साकार झालेले स्वप्न आहे 🙏🙏व्यासपीठावरील सर्वजण गात रहा🙏🙏आनंद घेत रहा 🙏🙏आणि आपले आयुष्य वाढवत रहा 🙏🙏🙏🙏हीच सदिच्छा 👍👍🙏🙏❤❤
आज आमचे गुरुवर्य श्री लक्ष्मणरावजी जाधव सर की जे या व्यासपीठाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे 👍👍उभयतांना वाढदिवसानिमित्त लक्ष्य लक्ष शुभेच्छा 🙏🙏आप दोनो जियो हजारो साल ये नि. सां. च. की है आरजू 🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹
 ❤  I love नि. सां. च.❤




निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुती , SONG FROM HOME अंतर्गत कराओके गीत गायन स्पर्धा SEASON I व SEASON II च्या यशस्वी आयोजनानंतर सर्व रसिक प्रेमी यांच्या आग्रहाखातर घेऊन येत आहे , खास रंगाचे  पर्व होळी निमित्त कराओके गीत गायन स्पर्धा SEASON III , नवोदित गायकांना  , आपले गायन कौशल्य जगाला दाखून देण्याची सुवर्णसंधी , सुवर्णसंधी  , सुवर्णसंधी हौशी निदेशकांचे हक्काचे संपूर्ण डिजिटल व्यासपीठ अंतर्गत नवीन सभासद अभियान राबविण्यात येत आहे ,आपल्या परिचित सर्व आवड असलेल्या निदेशक यांचे पर्यंत माहिती पोहचावा व सामील करून घ्या  , अधिक माहिती अवश्य भेट द्या : https://www.nscsuren.com/https-nsc-suren-blogspot-com/ 
https://www.instagram.com/surenrbhande/ , https://www.facebook.com/mritins.nsc.suren , 
https://twitter.com/BhandeSuren



Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे