निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II निमित्त , निवडक मान्यवर यांच्या प्रतिक्रिया

 निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II निमित्त  , 

 निवडक मान्यवर यांच्या प्रतिक्रिया   






श्री. भोजराज व. काळे सर , अमरावती 

प्रिय निदेशक बंधू भगिनींनो !
आपण सर्वांनीच मोबाईल ला स्पीकर/हेडफोन लावून निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या दुसऱ्या पर्वातील विजेत्यांनी गायिलेली गाणी मन लाऊन आयिका.आपण आनंदी व्हाल याची खात्री आहे,व उर अभिमानाने भरून येईल की आमची मंडळी या संगीत क्षेत्रातही भरारी घेत आहेत.त्यांना प्रोत्साहन द्या व नवीन उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देऊन सहभाग घेण्यास प्रवृत्त करा.तिसरे पर्व लगेच सुरू होईल. इच्छुकांनी ग्रुप मध्ये सामील होण्यास request पाठवा.



श्री. सिद्धार्थ मेहरे सर ,  नागपूर  

हार्दिक अभिनंदन आशिष खरात सर,रेवस्कर सर,निलजे सर,मोगरकर सर,अनिल काळे सर,रंजय दळवी सर💐💐💐💐💐💐
आपले पितामह श्री.भोजराज काळे सर व भावना मानकर मॅडम व मैनेजिंग डायरेक्टर सुरेन भांडे सर यांचे विशेष आभार🙏
सर्व एकसे बढकर एक गायक आहेत तेव्हा नंबर हे फक्त नंबर आहेत ,पुढिल वाटचाललीस हार्दिक शुभेच्छा💐💐
🙏निदेशक सांस्कृतिक चळवळीचा चा विजय असो🙏

श्री. एल एम जाधव सर ,  औंध , पुणे 
 
पर्व-2 मधील विजयी कलाकारांचे अं:करणापासून खूप खूप अभिनंदन.तसेच या व्यतिरिक्त जे सहभागी होते,ते ही जिंकलेले आहेतच. त्यांच्या गायकीला सुद्धा तोड नाही, हा निकाल निमित्तमात्र समजावा व आपली गायकी अजून कशी उंचावता येईल,यासाठी निरंतर प्रयत्न करत राहावा.ही मनापासून अपेक्षा, सुरुवातीपासून सहभागी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन... कारण तुम्हीही जिंकलेले आहात.🌹


श्री.श्रीकृष्ण रेवस्कर  सर ,  यवतमाळ   

सन्माननीय परीक्षक,तथा गुरुवर्य मा.भावना ताई मानकर मॅडम , मा. भोजराज जी काळे साहेब , माझे मार्गदर्शक mentor श्री. अजय जी जाधव सर,व इतर सर्व mentors, वेळोवेळी मला प्रोत्साहन देणारे इतर मार्गदर्शक , तसेच प्रेरणादायी प्रतिक्रिया देणारे सर्व गायक कलाकार मित्र या सर्वांचे माझ्या विजया बद्धल मन:पूर्वक धन्यवाद  ! 🙏🏻🙏🏻🙏🏻तसेच verson 2 मध्ये विजयी झालेल्या सर्वच गायक कलाकारांचे मनस्वी अभिनंदन।माझ्या मते स्पर्धे मध्ये विजयी झालेले सर्वच स्पर्धक हे पहिल्या क्रमांकाचेच विजयी असतात, स्पर्धेच्या नियमावलीनुसार मा. परीक्षकांना विजयी झालेल्या स्पर्धकांना क्रमांक देने हे क्रमप्राप्त असते, तेव्हा विजयी zalelya कलाकारांनी,मिळालेल्या क्रमांकावर नाराज न होता आनंदाने स्वीकारावे तसेच जे गायक कलाकार विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनी सुद्धा नाराज न होता जे विजयी झाले त्यांचा विजय हा आपल्या मुळेच झाला हा सुद्धा एक मोठा विजयच आहे, कारण तुम्ही नसते तर त्यांचा विजय कसा झाला असता। सर्व विजयी गायक कलाकार,तसेच नि.सा. च. मधील सर्व गायक कलाकार यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा,!!!!जय हो नि. सा. च.👏🏻👏🏻👏🏻


श्री. प्रभू  उघडे सर , अमरावती 

श्रीमान आशिष खरात सर, आम्हचे मित्र श्रीकृष्ण रेवस्कर सर, प्रभाकर निलजे सर,सतीश मोगरकर सर, अनिल काळे सर, व नेहमी उत्साही असणारे रंजय दळवी सर आपण सर्व करा ओके दुसऱ्या पर्वा मध्ये विजयी झाल्या बद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


अजय कनोजे  आयटीआय वर्धा ..........🌹🙏🏻🌹

निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या महा अंतिम फेरीमध्ये विजयी झालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन .....💐💐💐💐त्यातल्या त्यात श्री खरात सरांच्या मराठी गाण्यांचा.......आमचे परममित्र श्री मोगरकर सर यांच्या सहज सुंदर गायकीचा व मखमली आवाजाचा ......आणि ......आमचे भाई श्री दळवी सर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने सजलेल्या गाण्यांचा मी विशेष फॅन आहे त्यामुळे त्यांचे अजून एकदा अभिनंदन .....🌹🎼🎤या स्पर्धेतील मान्यवर जज श्री.भोजराज जी काळे सर व भावना ताईंचा तसेच या स्पर्धेसाठी व या ग्रुप साठी मेहनत घेणारे श्री सुरेन भांडे सर व सर्व मान्यवरांचे विशेष आभार........हार व जीत च्या पुढे जाऊन या मंचाने मला खूप काही दिले मनापासून  माझ्या गाण्यावर प्रेम करणारे लोक दिले.........कौतुकाने पाठीवर थाप देणारे मित्र दिले......परिवारा व्यतिरिक्त एक वेगळा परिवार दिला.........या मंचावरील सदस्य आता परिवाराचा एक भाग झालेत अगदी ते घरी वावरत आहेत असं वाटते कधी कधी........या मंचामुळे माझ्या गाण्यांमध्ये खूप सुधारणा झाली कारण चुकल्यास ते निदर्शनास आणून देणारे मित्र पण येथेच मिळाले........त्यामुळे या मंचावरील किंबहुना या मंचा सोबत सलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी कायम ऋणी आहे आणि राहील........असेच प्रेम राहू द्या.......व आपली मैफिल कायम अशीच राहू द्या .......

श्री. संजय आनंदे सर , सांगली  

NSC - पर्व -02 च्या सर्व विजेत्याचे अगदी मनःपुर्वक अभिनंदन ..... तस बघायला गेलं तर ही स्पर्धा फार छान आणि खेळीमेळीच्या वातावरणात .. आणि गाण्यांचा स्तर उंचावत पार पडली .. त्यासोबत वेगवेगळ्या कॉमेन्ट मुळे प्रत्येकांची गायीकी सुधारत गेली ... आणि मित्र परिवार देखील वाढला . हे या NSC ग्रुपचे वैशिष्ठ ... कारण बरेच जण एकमेकांना अजुनही प्रत्यक्षात न भेटता फक्त गाण्यांच्या रुपाने भेटलेले आहेत. . आणि संवाद साधत आहेत. . पुनः श एकदा सर्व विजेत्याचे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ...... सर्व मान्यवर परिक्षक ' व मॅडम .. आणि NSC सर्व गायकाचे मनःपुर्वक अभिनंदन ....🙏🙏🙏 व पर्व -03 च्या शुभारंभासाठी शुभेच्छा❤️❤️ 











   


Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे