एन.एस.सी. संगीत परिवार चा एक अत्यन्त मुलायम आवाज हरपला , निदेशक सांस्कृतिक चळवळ
एन.एस.सी. संगीत परिवार चा एक अत्यन्त मुलायम आवाज हरपला , निदेशक सांस्कृतिक चळवळ
श्री सतीशजी मोगरकर सर , शिल्प निदेशक , आय टी आय इंदोरा , नागपूर , यांचे आज दु ३.३० वाजता निधन अत्यंत वाईट बातमी , ऐकून मन सुन्न झाले , सतत हसमुख चेहरा, मनमिळावू , अजातशत्रू व्यक्तिमत्व , शांत व संयमी मनमिळावू मुलायम आवाजाचे कैलासवासी, सतीशजी मोगरकर सर , निदेशक सांस्कृतिक चळवळ सोबत सुमारे दीड वर्षांपासून जुळलेले असून संपूर्ण या संगीत परिवार मध्ये सौदायाचे संबंध प्रस्थापित करून आपल्या मृदू , भावस्पर्शी आवाजाने सर्वाची मने जिंकणारे , विविध गाण्याच्या स्पर्धा मध्ये सहभागी होऊन नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्तरीय SONG FROM HOME अंतर्गत कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व २ , क्रमांक ३ चे अंतिम विजेते होते , निदेशक सांस्कृतिक चळवळ , सरांना एक उत्कृष्ट मार्गदर्शक च्या रूपाने आता मुकला आहे , त्याचे अश्या या प्रेमळ गायक मित्राच्या अचानक जाण्याने संपूर्ण निदेशक सांस्कृतिक चळवळ परिवार वर शोककळा पसरली आहे , ईश्वर त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला या प्रसंगातून सावरण्याची शक्ती प्रदान करो , त्या निमित्त एक दिवसाचा दुखवटा या ग्रुप वर पाळण्यात येत आहे , सर आपण सुरांच्या माध्यमामधून आमच्या सोबत नेहमीच आठवणीत राहाल. शोकाकुल - निदेशक सांस्कृतिक चळवळ
शोक संदेश --
खूप खूप हृदयद्रावक व वेदनादायी घटना...ईश्वर असे कसे करू शकतो...फार वाईट झाले.चांगल्या उमद्या सहकाऱ्याला व गायकाला आज हे व्यासपीठ हरवले आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात समस्त व्यासपीठ व माझा परिवार सहभागी आहे. -------- श्री. एल एम जाधव सर , पुणे
अत्यंत दुखद बातमी आपल्या NSC परिवारातील एक उमदे गायक सतिश मोगरकर यांचे आज दुःखद निधन झाले,
भावपूर्ण आसवांजलि --,काही वेळ मी सुन्न होवुन गेलो ,काहीच कळत नव्हतं,आपल्या आवाजाच्या बळावर संपुर्ण महाराष्ट्रात आपली छाप टाकणारे व्यक्तीमत्व, अचानक पणे निघुन जाते,काय नियतीचा खेळ --------श्री. सिदार्थ मेहरे सर , नागपूर
Very shocking news ..अत्यंत वेदनादायी बातमी.. The real Hero of this NSC Gr. गमावला हो आपण भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻 त्यांच्या आत्म्यास शांती मिळो 🙏🏻 ही ईश्वर चरणी प्रार्थना -------श्री. अनिल काळे सर
हे भगवान ये केसी बिबता है.... यकिन ही नही हो रहा. इतना अच्छा
इन्सान अचानक हमारे बीच नही रहे
ईश्वर मृत अतमा को शाती दे ----------श्री. संजय कलोशे , कोल्हापूर
खरच अजिबात विश्वास नाही बसत माझा. इतके चांगले व्यक्ती इतका चांगला गायक, मन सुन्न झाले. सरांच्या आत्म्यास शांती लाभो. 💐💐💐🙏🙏🙏भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो -------श्री. प्रकाश कापसे सर मुंबई
अरे बापरे!!!! परमेश्वरा अजुन किती दुःख पेलायचे?? अजुन किती यातना सहन कराव्या लागणार!!!! निदेशक सांस्कृतिक चळवळीचा मोहरा हरपला.... या व्यासपीठासाठी यापेक्षा वाईट, दुःखद धक्का असूच शकत नाही... माझा कलाकार मित्र हरपला...हरहुन्नरी कलाकार हरपला... काही बोलावे काही सुचत नाही... मन सुन्न झाले आहे.. रंजय दळवी सर , सातारा
बातमी ऐकूनच मन एकदम उदास झाले धक्का बसला.काही सुचना असं झालंय. दररोज समोर एखादे गाणे सादर करायचे व आपल्या सर्वाची मने मोगरकर सर जिंकायचे. समोर ची व्यक्ती एकदम आपल्यातुन निघून गेली त्यांच्याबाबत काय बोलावे शब्द सूचना.मन हेलावुन टाकनारी अत्यंत वाईट बातमी अत्यंत वाईट. -------संजय कोळी सर , कोल्हापूर
अत्यंत दुखःद घटना .
आपल्या सर्व NSC परिवाराचेवतीने व निदेशक संघटनेच्या महाराष्ट्रातील तमाम सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली .परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. ------ श्री. महादेव आबा माली सर
अरे देवा चांगला मित्र बंधू गमावला.गाणे झाल्यावर हमकास फोन यायचा .प्रत्यक्ष भेट नाही पण खूप खूप चांगला मित्र गमावला.परमेश्वरा इतकाही अंत पाहू नका , शिवाजी हांडे सर
खुपच वाईट बातमी..माझा आणि सरांचा परिचय या प्लेटफॉर्म वरंच झाला, पण खुपच वाईट वाटतंय... आपल्या संगीत परिवाराचा अजून एक तारा निखळला..भावपूर्ण श्रद्धांजलि , प्राजक्ता गायकवाड मॅडम
भावा,काळजात स्थान निर्माण केलं तू...तुझ्या बातमीने पहिल्यांदाच खचल्या च जाणवल ,छातीचे ठोके वाढलेत,निरागस होता तू,..सतत तू आंगावर शाल पांघरून गझल गातांनाचा चेहरा सतत समोर येतो... निदेश क सांस्कृतिक चळवळ सतत तुला स्मरून वाटचाल करेल....साश्रू नयनांनी तुला श्रद्धांजली..आमचा संपूर्ण परिवार हादरला,नेहमीच तू असण्याच भास आम्हाला जाणवेल ........ भोजराज वा. काळे सर , अमरावती
अत्यंत दुःखद घटना आहे ही...ईश्वरीय निसर्गदत्त आवाजाची देणगी लाभलेला कलाकार आज आपल्यात नाही ... मोगरकर सर निदेशक सांस्कृतिक चळवळीचा हा परिवार आपणाला कधीच विसरू शकणार नाही...🌸🌸 भावपूर्ण श्रद्धांजली सौ. भावना मानकर मॅडम
मित्रा हे असं व्हायला नको होतं काल सायंकाळी तुझी जाण्याची बातमी कळली मन सुन्न झालं डोळ्यात पाणी थांबत नव्हतं तुझ्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली लिहिण्याची हिम्मत होत नव्हती मी एकाही ग्रुप वर तुला श्रद्धांजली नाही वाहू शकलो मागील सात वर्षापासून आपण एकत्र आहोत त्यातील चार वर्ष वर्धेला आपण एका संस्थेत होतो नागपूर-वर्धा सोबतच येणं जाणं व्हायचं तो संपूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला खरंच तुझ्या जाण्याने एक मनमिळाऊ, प्रेमळ, अजातशत्रू मित्र आम्ही गमावला तसेच या ग्रुप वरील एक अत्यंत संवेदनशील ,कलेची जाण असलेला ,मोरपंखी स्पर्षा सारखा हळुवार मुलायम आवाजात गाणारा एक दर्दी कलावंत ,एक तारा कायमचा निखळला तुझी कमी आम्हाला कायम जाणवले तुझ्या कुटुंबासाठी एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेलास ईश्वर त्यांना या सर्व गोष्टीतून सावरण्याची शक्ती देवो मित्रा तुला मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली।।💐💐
ऐसे जीवन भी हैं जो जिये ही नहीं जिनको जीने से पहले ही मौत आ गयी ।
फूल ऐसे भी हैं जो खिले ही नहीं
जिनको खिलने से पहले फिजां खा गयी।
है परेशां नज़र थक गये चारागर कोई समझा नहीं कोई जाना नहीं।
ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफ़र कोई समझा नहीं कोई जाना नहीं। श्री. अजय कनोजे सर , वर्धा
अत्यंत दुखःद बातमी ... खर तर अजुनही विश्वास बसत नाही .. उकृष्ठ गायकी लाभलेला ' एक उकृष्ठ गझल गायक ' पर्व - 02 मध्ये आपल्या गायकीचा उकृष्ठ नमुना सादर करून विजेते ठरलेले .... मोगरकर सर ... NSC ग्रुप आपल्याला सदैव स्मरणात ठेवील ... संजय आनंदे सर , सांगली

Comments
Post a Comment