"निदेशक सांस्कृतिक चळवळ" नावात च एक व्यापक असा दृष्टीकोन आणि एक सुंदर नात्यांची गुंफण। प्रशांत बंडगर , गट निदेशक , ITI दिंडोरी , जिल्हा नाशिक

 "निदेशक सांस्कृतिक चळवळ" नावात च एक व्यापक असा  दृष्टीकोन आणि एक सुंदर नात्यांची गुंफण। 

प्रशांत बंडगर , गट निदेशक , ITI दिंडोरी , जिल्हा नाशिक 

अनेक वर्षे झाली या खात्यात सर्विस करून।

या पूर्वी  विविध खाजगी आस्थापना मध्ये काम केलेलं, इकडे आल्यावर एक वेगळच आनंद,वेगळं रूप,काम चं स्वरूप वेगळं।

खाजगी आस्थापना त्याही मल्टिनॅशनल परंतु अतिशय हेल्दी वातावरण,सांस्कृतिक कार्यक्रमाची भरमार, त्यातून मिळणारा कॉन्फिडन्स आणि कामा प्रति निष्ठा,आस्थापने विषयी  आदर, सन्मान,आस्था परस्पर नाती यांची वीण घट्ट होत असे.या गोष्टी ओघाने येतात असं आमचे सिनियर्स आणि उच्च अधिकारी बोलायचे,आणि आम्ही अनुभवायचो।

घर आणि कामच ठिकाण एकच वाटायचं।

इकडे आल्यावर जवळपास 23 वर्षांनी हा फील आला।

अस काही व्यासपीठ आणि ते ही संघटना स्तरावरून हाताळले जाईल अस वाटलं नव्हतं।

परंतु आश्चर्यकारक पणे मला या चळवळीचा मागोवा लागला ।आणि मी व्यक्त झालो।आपल्या अडमीन आणि सर्वोसर्वा मा भोजराज जी काळे ,सुरेंन सर आणखी मान्यवर यांनी मला ग्रुप मध्ये सामावून घेतलं।

आज खऱ्या अर्थाने अश्या प्रकारच्या चळवळीतून आपण मनाने आणि विचाराने एकत्र आलो आहोत असं वाटतंय।

कला आणि कलाकार हे चुंबका सारखे एकमेका कडे आकर्षित होतात असे म्हणतात।

या ग्रुप शी ,व्यासपिठाशी जोडलेले लोक नक्कीच संवेदनशील  आणि मोठ्या मनाचे कलाकारआहेत।

एका पेक्षा एक।


ना वय ना पद सगळं काही समान ,आणि मोकळ्या मनाने दाद देणं हा स्थायीभाव खूप जास्त आढळून आला।

या अश्या संकल्पना च सर्वांना एकत्र, एकाच व्यासपीठावर,आणि एका दिशेने,मार्गदर्शनाने योग्य दिशेला नेऊ शकतात या बद्धल मी खूप अभिमानाने खात्री देऊ इच्छितो।


मन फ्रेश,तर वातावरण फ्रेश,

वातावरण फ्रेश तर कार्य फ्रेश।


या व्यसपीठाशी संलग्न कार्यरत सर्व व्यक्तींना प्रणाम आणि हार्दिक  आभार।

चळवळ खूप व्यापक रूप घेवो ही सदिच्छा।🌹

मा बाळापुरे साहेबांना नेहमी fb वर ऐकतो।कला जोपासक उच्चअधिकारी🙏🏻

 त्यांनी आपला बहुमोल वेळ आपल्या ग्रुप साठी दिला त्या साठी आभार ।गाण्यात मार्गदर्शनाची अपेक्षा करतो।🙏🏻

Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे