निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION चे आयोजण , संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आता , NSC App वर

सर्व संगीत प्रेमी साठी , आनंदाची बातमी , निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION चे आयोजण , संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आता , NSC App वर , आताच download करा, घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या

सुचना - सर्व सभासदना/ रसिक प्रेमीजन यांना सूचना कि , प्रथम अँप लिंक crome browser मध्ये ओपन करून आपल्या मोबाइलला ला अँप इन्स्टॉल करावा व पर्व 3 , प्रथम चरण मधील , सर्व स्पर्धाकाना सूचना कि , त्यांना आपले गाणे , NSC App वर नोंदणी करावे तसेच संपूर्ण गायक वर्ग यांना विनंती कि त्यांनी आपली निवडक उत्कृष्ट गाणी बेस्ट प्रॅक्टिस म्हणून अँप वर पोस्ट करावी , धन्यवाद

App Link -  https://strong-ray-6120.glideapp.io/



श्रम,परिश्रम,प्रेरणा व नीसांच ...🎻
लक्ष्मण जाधव , आयटीआय , औंध , पुणे

रचानात्मक ध्येय मिळवण्यासाठी घेणात आलेल्या श्रमाला सर्जनात्मक श्रम म्हणतात. कागदाचा उपयोग करून ओरिगामी कलेचा वापर करणे, (ओरिगामी म्हणजे मूळची जपानी कला. 'ओरु' म्हणजे घडी घालणे आणि 'कामी' म्हणजे कागद. कागदाला विविध प्रकारे घड्या घालून प्राणी-पक्षी,पानं-फुलं तयार करायला शिकवणारी ही कला आज जगभर पसरलेली आहे.)काहीतरी नवीन लिहिणे, भाषांतर करणे, नवीन कलाकृती निर्माण करणे ह्याला आपण सर्जनात्मक श्रम म्हणू शकतो.

कसला तरी चांगला विचार करणे ह्याला पण आपण श्रम म्हणू शकतो.कारण त्यात व्यक्तीची बौद्धिक क्षमता वापरली जात असते. थोडक्यात परिश्रम म्हणजे शारीरिक व मानसिक या दोन्हींचा संयोग किंवा श्रम म्हणजे परिश्रम होय.परिश्रमाशिवाय जीवन व्यर्थ आहे.कारण निसर्गाद्वारे दिलेल्या संसाधनांचा योग्य उपयोग तोच करू शकतो जो मेहनती असतो. व्यासपीठावरती मी पर्व-एक पासुन यास साक्षीदार आहे. सतत कोणत्याही प्रकारचा थकवा,शिनवटा अंगी नबाळगता ग्रुप कार्यरत ठेवणे,ब्लॉगची निर्मिती आणि आज ॲपची निर्मिती असं म्हणावं लागेलकी, श्रीयुत.सूरेनजी भांडेसर म्हणजे नियतीने निर्माण केलेलं एक अजब रसायन आहे,त्यांच्या अविरत परिश्रमाला पर्याय नाही...लाख सलाम त्यांच्या मेहनतीला. आता ही प्रेरणा कुठून मिळते तर निश्चितच त्यांचे हे उत्तर असेलकि, व्यासपीठावरील माझे प्रिय सर्व सहकारी, त्यांचं मनापासूनच समर्पण व कष्ट आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळते. येथे खऱ्या अर्थाने श्री.भांडेसरांच्या कष्टाचा विजय आहे.जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.

यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मतःच मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. निदेशक सांस्कृतिक चळवळ परिवार हा आपल्या सर्वांचे प्रिय जिवापाड प्रेम करणारे कुटुंब आहे. यात आपण एकमेकांच्या कडून प्रेरणा घेऊन त्यांचं अनुकरण करून आपल्या गायकीमध्ये सुधारणा करत आहोत.अनुकरणाबरोबरच प्राप्त परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील आपल्या सर्वांच्या स्वप्रेरणेचा भाग आहे.सर्वजण एकमेकांच्या सुखात,दुखात,आनंदात मनमोकळेपणाने सहभागी होत आहेत. अगदी रक्ताच्या नात्यापलीकडेही या व्यासपीठावरील आपले एकमेकांशी असलेले ऋणानुबंध हळुवारपणे जपत आहोत.
पुन्हा एकदा श्रीयुत.सुरेनजी भांडेसरांच्या ॲप निर्मितीला खूप खूप शुभेच्छा व मनापासून धन्यवाद.🙏🏻

श्री. फारूक मुजावर सर यांची अँप विषयी प्रतिक्रिया

सुरेन भांडे सर हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांच्या नांवातच सुर आहे. ते तज्ञ शिल्प निदेशक आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून ते एन.एस.एस.चे काम मनापासून करतात. संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रती त्यांनां नितांत आदर आहे. निधर्मवाद हा त्यांचा स्थायीभाव आहे. प्रशिक्षणार्थी प्रथम ह्या त्यांच्या तत्त्वानुसार अत्यंत व्यस्त असतात तरीही त्यांचा लॉकडाऊन काळात ऑनलाईन लेक्चर चुकलेला नाही. निसांचचे तर सर्वेसर्वाच आहेत. टेक्नोसॅव्ही असल्यामुळे ब्लॉग व निसांचचे अॅप निर्माते आहेत. आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वभावात अहंपणा नसल्यामुळे मोठ्या मित्रपरिवारचे धनी आहेत. सरांच्या कार्यकर्तुत्वाला मानाचा त्रिवार मुजरा.










Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे