औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव निमित्त , देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा चे आयोजन
औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव निमित्त , देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा चे आयोजन
स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव निमित्त ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे संस्थेतील प्रक्षिक्षणार्थी कर्मचारी यांचे करिता कराओके देशभक्ती पर हिंदी/मराठी गीत गायन स्पर्धा चे आयोजन स्वातंत्र दिन दिनांक १५.०८.२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता , संस्थेतील NSS हॉल, मध्ये करण्यात आले होते , या कार्यक्रमाला मुख्य अथिति म्हणून श्री. प्रदीपजी घुले साहेब , सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , अमरावती , श्री. नरेंद्र येते साहेब , श्री. कमलाकर विसाळे साहेब , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , अमरावती , श्री. विवेक पडोळे साहेब , प्राचार्य , मोझरी , श्री. रवींद्र लोखंडे साहेब , श्री. कुमरे साहेब , श्री. जवंजाळ साहेब , सोबत संस्थेच्या प्राचार्या सौ. मंगला देशमुख मॅडम श्री. राजेश जी चुलेट साहेब यांची उपस्तीथी होते , सर्पप्रथम मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला नंतर अमरावती विभाग मध्ये खात्या मार्फत २०२१-२२ चा प्रथम पुरस्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्था , अमरावती ला प्राप्त झाल्या बद्दल संस्थेच्या प्राचार्या सौ. मंगला देशमुख मॅडम यांचा सत्कार श्री. प्रदीपजी घुले साहेब यांच्या वतीने सर्वांच्या साक्षीने घेण्यात आला , या स्पर्धेत जवळपास १३ सहभागी प्रशिक्षणार्थी व ५ कर्मचारी यांनी या गायन स्पर्धेत सहभाग दर्शविला , देशभक्तीने प्रेरित होऊन सर्वानी अतिशय सुंदर देशभक्ती पार गीतांची प्रस्तुती दिली , ये मेरे वतन के लोगो , संदेशे आते है , 'तेरी मिट्टी में मर जावा , तू मेरा कर्मा , तू मेरा धर्मा , कर चले हम फिदा वतन साथीयो , जण गण मन या गीतांनी उपस्तित रसिक मंडळी ची दाद मिळवली , काही निवडक गीतांना प्रोत्सहान पर बक्षीस म्हणून उपस्थित मंडळी मधून , रोख रक्कम सहभागी प्रशिक्षानार्थी यांना मिळाली , या स्पर्धा मध्ये ड्रॅफ्टमन ची प्रशी. कु.समिक्षा थोरात प्रथम क्रमांक , कु. प्रज्ञा मोहोड , कोपा ट्रेड दुसरा क्रमांक व गिरिधारी राठोड , स्टेनो ट्रेड तिसरा क्रमांक , तेजस वैद्य - प्रोत्साहनपर क्रमांक , सर्व विजेत्यांना संस्थेतर्फे सुंदर प्रमाणप्रत्र प्रदान करण्यात आले , सदर स्पर्धेचे परीक्षण सौ. सीमा पाटपागे मॅडम व सौ. खैरे मॅडम यांनी योग्य प्रकारे केले , या कार्यक्रम मध्ये विशेष म्हणून शिवगर्जना व कु. प्रगति रोंघे हिचे लाठी काठी चे उत्कृष्ट प्रात्यक्षित ने सर्वांची दाद घेतली , सोबत संस्थे मधील सुवर्ण महोत्सव मध्ये उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या कर्मचारी यांचा प्रमाणप्रत्र देऊन सत्कार करण्यात आला , सदर स्पर्धा यशस्वीते करीता संस्थतील राष्टीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी श्री. रौंदळकर सर व श्री. निलेश इसळ सर यांचे सहकार्य उपयुक्त ठरले , या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व संचालन श्री. सुरेन आर भांडे , चित्रकला निदेशक व श्री. किरणकुमार वानखडे गट निदेशक यांनी केले , संपूर्ण कार्यक्रमाला रसिक मंडळी पैकी मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी व कर्मचारी यांनी भरभरून दाद दिली , सोबत सहभागी सर्वांचेच कौतुक केले.
विविध माध्यमांनी घेतलेली बातमीची दखल ----




Comments
Post a Comment