महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना चा २ जुन २०२१ रोजी वर्धापन दिन आयोजन निमित्त निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) ऑनलाईन मीट संपन्न

महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना चा २ जुन २०२१ रोजी वर्धापन दिन नियोजन निमित्त  निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) ऑनलाईन मीट संपन्न 

महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना चा २ जुन २०२१ रोजी वर्धापन दिन नियोजन  निमित्त  निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) ऑनलाईन मीट चे आयोजन दिनांक २३.०५.२०२१ रविवार रोजी दुपारी ०२.०० वाजता काण्यात आले होते  ,  सद्यस्थितीत  कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये  संपूर्ण महाराष्ट्रभर  , निदेशक सांस्कृतिक चळवळ ( NSC) , हे संगीत व्यासपीठ , एक संगीतमय दिलासा सोबत म्युझिकल थेरपी  एक ईम्युनिटी बूस्टर चे कार्य करत आहे , त्या प्रसंगांचे संपूर्ण दाखले पण NSC पर्यंत प्राप्त झालेले आहेत ,  सादर व्यासपीठ गेल्या तीन वर्षांपासून या संगीत क्षेत्रात कार्यरत असून गेल्या २ जून २०२० पासून ,  महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे SONG FROM HOME संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  डिजिटल व्यासपीठ  माधमातून यशस्वी आयोजन पर्व १ , पर्व २ चे आयोजन केले होते , त्या मधून उत्कृष्ट १२ गायकांची निवड करून त्यांना NSC ग्रुप मेंटॉर्स म्हणून गौरविण्यात आले असून आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धाना पण सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपाट त्यांच्या ई-मेल वर प्रदान करण्यात आले तसेच या स्पर्धेच्या आयोजन सोबत कलाकार व सक्रिय सभासद  यांचे वाढदिवस , लग्नाच्या वाढदिवस , दिन विशेष , राष्टीय सण/ उत्सव , महान गायक कलाकारांची जयंती / पुण्यतिथी / श्रधांजली पर्व , परिवारातील आनंद उत्सव संपूर्ण गायक मंडळी संगीतमय स्वरूपात  त्याच थिम नुसार गाणे सादर करून साजरे करतात. आणखी एक जमेची  बाब म्हणून NSC च्या माध्यमातून अनेक सामाजिक  उपक्रम पण राबविण्या येतात , गरजू निदेशक मंडळी यांना सर्व बाब तपासून त्याचे कुटूंबियांना आर्थिक मदत , सदस्यांची कोरोना च्या काळात गरजू लोकांना मदत , विविध ठिकाणी वृक्षारोपण , रक्तदान शिबीर   सामाजिक उपक्रम देखील राबवत आहेच   सदस्य  NSC परिवाराची संख्या २३० च्या वर असून या डिजिटल व्यासपीठ व १३० च्या वर कलाकारांनी आपली कला/गायन  या व्यासपीठ वर सादर केले आहे , डिजिटल युगातील एक पाऊल पुढे म्हणून अद्यावत NSC अँप चा  उत्कृष्ट वापर , आपल्या मोबाईल मध्ये व संगणक वर करून  या निदेशक सांस्कृतिक चळवळीचे संम्पूर्ण कामकाज या NSC अँप च्या माध्यम चालते  , NSC अँप ला पण अतिशय भरभरून प्रतिसाद सर्वच स्तरावर मिळत आहे ,  संपूर्ण निदेशक मंडळी , त्याचा परिवार , मित्र परिवार , हौशी कलावंत , रसिक मंडळी या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ चा लाभ घर बसल्या घेत आहेत व निदेशक मंडळी पण या व्यासपीठ वर या गायन क्षेत्रात पारंगत होत आहेत , तसेच संपूर्ण NSC व्यासपीठ हे फक्त  गायन क्षेत्र या पुरते मर्यादित न राहता , अधिक व्यापक स्वरूपात जसे इतर कलात्मक क्षेत्र , गिटार , बासुरी  , तबला , कॅसिओ वादन तसेच चित्रकला , कार्यानुभव , व्हिडिओ ग्राफी , फोटोग्राफी , लेखन/कविता लेखन क्षेत्र इत्यादी  चा समावेश करून  संपूर्ण महाराष्ट भर कार्य करण्याचा मानस आपल्या प्रास्ताविक मध्ये श्री. सुरेन आर भांडे , यांनी व्यक्त केलेला आहे , येणाऱ्या २ जून २०२१ संघटनेच्या वर्धापन निमित्त विविध उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन हे व्यासपीठ करणार आहे , त्यासाठी या गुगळे मीट चे आयोजन करण्यात आलेले आहे. 

एन एस सी चे प्रेरणास्थान असलेले माजी संचालक  सहसंचालक डॉ श्री रवींद्र जी बाळापुरे साहेब यांनीसुद्धा आपल्या प्रमुख सहभाग मध्ये बोलताना संपूर्ण व्यासपीठाला भरभरून शुभेच्छा देत भविष्यामध्ये लागलेल्या संपूर्ण तांत्रिक बाबींसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले सर्व कलाकारांची तोंडभरून कौतुक केले, तसेच जगजीत सिंग यांच्या सुंदर गाण्याने सर्व उपस्तित वर यांचे मनोबल उंचाविले. 

तसेच याप्रसंगी निदेशक संघटनेचे माजी सरचिटणीस तसेच निदेशक सांस्कृतिक चळवळीचे आधारस्तंभ परीक्षक असलेले श्री भोजराज जी काळे सर यांनी संपूर्ण कलाकारांची विचारपूस करत कोणताही उपक्रम सातत्याने राबविण्याकरिता करिता त्याला नवीन नवीन कल्पकतेची गरज असते त्यानुसार निदेशक सांस्कृतिक चळवळीचे कार्या विषयी भक्कम आशावाद दर्शविला व संघटनेच्या २ जून २०२१ वर्धापन दिन निमित्त सरांनी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे एक संघटन गीत चळवळीतर्फे राबविण्याच्या सूचना देऊन तसेच होणाऱ्या स्पर्धा ह्या अतिशय संगीत तांत्रिक दृष्टिकोनातून करायचे असल्यामुळे  संगीतामधील राग यांच्यानुसार गायक कलाकारांना गाण्याची संधी द्यावी अशा पण सूचना त्यांनी केले आहेत तसेच सर्वांनी कोरोना या आजाराला गांभीर्याने नुकतेच या आजारातून मुक्तता मिळाल्यामुळे आपला अनुभव व संपूर्ण विलगीकरण च्या काळात एनसीसीची झालेली संगीतमय मदत व  संसर्गित व्यक्तींना पण सुद्धा प्रेरणात्मक गाणी ऐकून त्यांचे मनोबल उंचावले , अशाप्रकारे त्यांनी संपूर्ण ऑनलाईन सभेला मार्गदर्शन केले

तसेच या सभेला महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना चे राज्य पदाधिकारी श्री मधु भाऊ उघडे सर , श्री मंगेश जी पुंडकर सर , श्री विनोद पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती व सर्वांनी सदर उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या , एन एस सी चे नियुक्त मेंटोर्स श्री. संजय आनंदे सर , सांगली , श्री. संजयजी कोळी सर कोल्हापूर , श्री. संजय जाधव सर , गड हिंग्लज , श्री. अजय जी जाधव सर वाशीम हे उपस्थित होते तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व एन एस सी चे गायक कलाकार यांनी सुद्धा आपले मनोगत सुंदर व्यक्त केले , येणारा संघटनेचा वर्धापन दिन हा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार  पाडण्याचा सर्वांनी निर्धार करत श्री लक्ष्मण जाधव सर पुणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सांगता केली.

अधिकाधिक निदेशक बंधू व भगिनींनी या कलात्मक व्यासपीठ वर आपले उत्कृष्ट कलागुण सादर करून एक आत्मिक आनंद घ्यावा हि विनंती ...... आपलेच कलाकार , आपले व्यासपीठ ....... निदेशक सांस्कृतिक चळवळ   

https://nsc-suren.blogspot.com      

NSC अँप लिंक-  https://strong-ray-6120.glideapp.io/   crome browser मध्ये ओपन करून अँप इन्स्टॉल करा व घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या





निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा 

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा


निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा


   

Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे